– प्रशिक्षण शिबीराला खा. अशोक नेते यांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणूक संबंधित भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण शिबीर (Training camp) आयोजन भाजपा कार्यालय हैद्राबाद येथे करण्यात आले.
या कार्यशाळाला राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे तथा खा. अशोक नेते यांना तेलंगणा राज्यातील निरमल जिल्हा प्रभारी म्हणून खानपुर, निरमल, मुधोली या क्षेत्राची महत्वाची जबाबदारी देण्यात आली.
सदर प्रशिक्षण शिबीराला प्रामुख्याने राष्ट्रीय संघटन महामंत्री बि.एल. संतोष, तेलगांना प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री किसन रेड्डी, प्रकाश जावडेकर, प्रविण दरेकर, डि.के. अरुणा तसेच अन्य मंत्री महोदय व पदाधिकारी उपस्थित होते.