Latest Posts

फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली द्वारा हनुमान वार्ड येथे पीआरए चे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आज ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली द्वारे प्राचार्य डॉ. सुरेश खंगार यांच्या मार्गदर्शनात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सत्र २०२३-२४ बी.एस.डब्ल्यू भाग-२ सेम-३ च्या समवर्ती सराव अध्ययनातील अनिवार्य घटक पीआरए ची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने गडचिरोली शहरातील हनुमान वार्ड येथे पीआरए चे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी समुदायातील नागरिकांचा सहभाग मिळवून हनुमान वार्ड चा नकाशा काढण्यात आला. यामध्ये हनुमान वार्ड येथील शाळा, मंदिर, दुकाने, बाजार, मस्जिद, निवासाची ठिकाणे, पाण्याचे स्त्रोत, आदींची नोंद या नकाशात नागरिकांच्या सहभागातून करण्यात येऊन. पीआरए या घटकाची पूर्तता करण्यात आली.

या प्रसंगी बी.एस.डब्ल्यू भाग-२ चे सर्व विद्यार्थी वर्ग समन्वयक प्रा. दिपक तायडे तथा समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss