Latest Posts

साकोली : माजी मंत्री शिवाजी मोघे यांच्या निषेधार्थ माना जमात बांधव शुक्रवारला रस्त्यावर उतरणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : १३ ऑक्टोबर २०२३ रोजी शुक्रवारला माजी राज्यमंत्री शिवाजी मोघे यांच्या निषेधार्थ भंडारा जिल्यातील माना जमात बांधव रस्त्यावर उतरत तहसीलदारांना निवेदन सादरकरण्याकरित पोलिस स्टेशनला त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करतील.

नागपूर येथील आदिवासी क्षेत्रबंधन मुक्त दिवसानिमित्य जाहीर कार्यक्रमात माजी समाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे यांनी आदिवासी माना जमाती बाबत हमारी सरकार आयी तो हायर पॉवर् कमिशन नेमो उसमे गलती से एंट्री आयी है उसमे माना भी है. यह गोंड माना के लिये है. सब माना के लिये नही है. यह गलत है उसे निकाल डालो अशा प्रकारचे असैविधनिक वक्तव्य करून सर्वोच्य न्यायालय यांनी दिलेल्या ८ मार्च २००६ च्या निर्णया विरुद्ध असून न्यायालय न्यायालयाचा अवमान केला आहे.

माना जमातीच्या संबंधात वारंवार असे वक्तव्य केले जातात. त्यांचे हे विधान केवळ द्वेष भावना आणि आकसापोटी असून संपूर्ण माना जमातीचा त्यांनी अवमान केला आहे. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ देवराम घोडमारे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी युवा संघटना, आदिम जमात मंडळ, आदिवासी समन्वय समिती आणि माना जमात बांधवानी निषेद मोर्च्याचे आयोजन केले आहे. हा मोर्च्या सेंदूरवफा येतील गजानन मंदिर ते तहसील कार्यालय साकोली असा राहील.

Latest Posts

Don't Miss