विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचालित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील विद्यार्थी प्रकाश राजेश मडावी याने १९ वर्षीय मुले भालाफेक स्पधेत दृतिय क्रमांक, भाग्यश्री क्रुपाराम उसेंडी हिने १९ वर्षीय मुली लांब उडी स्पधेत दृतिय क्रमांक व गोळाफेक स्पधेत तृतीय क्रमांक, पवनेश्वरी सुरेश मडावी हीने १९ वर्षीय मुली गोळाफेक स्पधेत दृतिय क्रमांक, ओम सुभाष नैताम याने १७ वर्षीय मुले उंच उडी स्पधेत दृतिय क्रमांक, अर्जुन बक्का कुळमेथे याने १९ वर्षीय मुले उंच उडी स्पधेत दृतिय क्रमांक, वैष्णवी तुळसिराम कोडापे हिने १९ वर्षीय मुली लांब उडी स्पधेत दृतिय क्रमांक, मोहन मडावी याने १९ वर्षीय मुले लांब उडी स्पधेत तृतीय क्रमांक, वनश्री चंद्रकांत सिडाम १९ वर्षीय मुली थाळीफेक स्पधेत तृतीय क्रमांक प्राप्त केले आहेत.
प्राचार्य वरुण उकर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा शिक्षक धनराज सुधाकर पोटावी, सहकारी शिक्षक सुशील हुलके, मोईन खान, पठाण आणि सर्व शिक्षक व शिक्षीका विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना समोरच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन करण्यात आले.
आपल्या मुलांना स्पधेत सहभागी होऊ द्या, त्यांना लढू द्या, विजय – पराभवाचा आस्वाद घेऊ द्या, कारण भविष्याची वाटचाल स्पर्धात्मक युगाची आहे. शारिरीक शिक्षण देखील सर्वांगीण विकासाची वाट – धनराज पोटावी