विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व भात पड क्षेत्रात रबी पिके लागवड योजना रब्बी हंगामात शेतक-यांचे उत्पनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कृषि विभागा मार्फत पिक प्रात्याक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण, एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन,एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापन या बाबी महाडीबीटी व्दारे राबविण्यात येत आहे.पिक प्रात्याक्षिके अंतर्गत सुधारित तंत्रज्ञानावर आधारित व आंतरपिक पिक प्रात्यक्षिके करीता हेक्टरी रू.९०००/-
तसेच पीक पध्दतीवर आधारित पीक प्रात्यक्षिके करीता हेक्टरी रू.१५ हजार /- अनूदान देय आहे. कडधान्य पिक– हरभरा व गळीतधान्य पिक– जवस, करडई आणि मोहरी पिक प्रात्याक्षिके राबविण्याकरिता एका गावातून किमान २५ शेतक-यांचे अर्ज महाडीबीटीवर असणे अनिवार्य आहे. प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत शेतक-यांना कृषि केंद्रा मार्फत अनूदानावर अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण (१० वर्षा आतील बियाणे) किंमतीच्या ५०% किंवा रू. २५००/- प्रती क्वि. तसेच अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण (१० वर्षा वरील बियाणे) किंमतीच्या ५०% किंवा रू. १२००/- प्रती क्वि. याप्रमाणे अनूदान देय आहे.
एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापन अंतर्गत सुक्ष्म मूलद्रव्ये किंमतीच्या ५०% किंवा उच्चतम रू. ५००/- हेक्टरी तसेच जैविक खते किंमतीच्या ५०% किंवा उच्चतम रू. ३००/- हेक्टरी अनूदान देय आहे. एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन अंतर्गत पिक संरक्षण औषधे किंमतीच्या ५०% किंवा उच्चतम रू. ५००/- हेक्टरी तसेच तणनाशके किंमतीच्या ५०% किंवा उच्चतम रू. ५००/- हेक्टरी अनूदान देय आहे. वरील सर्व बाबींचा लाभ घेण्याकरिता शेतक-यांनी महाडीबीटी साईट https://mahadbtmahait.gov.in/ वर वैयक्तीक/शेतकरी गट अर्ज करावे, असे आव्हान श्रीमती संगीता माने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा यांनी केलेले आहे.