Latest Posts

रत्नापूर येथे दुर्गा उत्सव निमित्य भगवान श्रीकृष्णाचा दिव्य चतुर्भुज विराट रूप देखावा

– श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाचा उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindevahi) : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे श्री. गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ कार्यरत असून सतत १९ वर्षांपासून नवरात्र उत्सवात दुर्गा मातेची स्थापना करून दरवर्षाला भक्त जनासाठी देखावा व समाज उपयोगी विविध कार्यक्रम उपक्रम सादर केले जातात. दरवर्षाला हया देखावा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्हयातील व विदर्भातील जनता गर्दी करीत असतात. या मंडळा तर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम उपक्रमाचा लाभ देखील घेत असतात म्हणून हे मंडळ संपूर्ण विदर्भात नावारूपास आलेले आहे. लाखोच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थीत राहुन संपूर्ण नवरात्र उत्सवाचा आस्वाद व लाभ घेतात. त्यामुळे रत्नापुरात नवरात्र उत्सवात जत्रेचे रूप प्राप्त होवून गावात संपूर्ण भक्तीमय वातावरण तयार होते.

सतत दर १९ वर्षाची परंपरा जोपासत या वर्षाला मंडळातर्फे या नवरात्र उत्सवात भगवान श्रीकृष्णचा दिव्य चतुर्भुज विराट रुप दाखवणारा देखावा जनतेसाठी खुला आहे. त्या देखाव्यात प्रामुख्याने श्रीकृष्ण यांचे जन्म कर्म, सुत देवा मध्ये वासुदेव यमुना नदी पार करतांना देखावा, माखनचोर श्रीकृष्ण, प्यारचा सागर अभिव्यक्ती श्रीष्कृण लीला, कालीया, मर्दनलीला, पवन यमुना नदीवर नुत्य करताना श्रीकृष्ण, चतुर्भुज विराट रुपचे पार्थ, अर्जुनाला भगवतगीता सांगताना कृष्ण, राधा सोबत लीला, अशा प्रकाराच्या भगवान श्रीकृष्ण यांच्या नानाविध जवळपास १५ ते २० प्रकाराचे सिन या देखाव्यात सादरीकरण होत आहे. म्हणजे या देखाव्यात भगवान श्रीकृष्ण यांची संपूर्ण जीवनगाथा रेखाटली असुन या देखाव्याचे माध्यमातून ती जनतेला प्रलोभनीय देखाव्यात सादर होत आहे.

हा संपूर्ण देखावा रमनिय असुन प्रबोधन पर आधारित आहे. १५ आक्टोबर पासुन म्हणजे दुर्गा मातेच्या स्थापने पासून भक्त जनासाठी बघण्यासाठी खुला आहे. सध्या हे काम जोमाने सुरू असून पूर्णत्वास येत आहे.

सोबतच मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे सामाजीक उपक्रम व कार्यकमाची मेजवानी मीळणार आहे. त्यात प्रामुख्याने १५ आक्टोबरला दुपारी २ वाजता दुर्गा मातेची स्थापना होईल, १६ आक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्यावर पाच ते दहावीच्या विद्यार्थी साठी चित्रकला स्पर्धा, १७ आक्टोबरला दृष्टी हीन लाभार्थी रुग्न यांना नवि दृष्टी देण्यासाठी भव्य विनामुल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर, रात्रिला मुला मुलीचे कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतीक कार्यक्रम, १८ आक्टोबरला भव्य कर्करोग (कॅन्सर) तपासणी शिबीर, रात्री वेषभूषा स्पर्धा, १९ आक्टोबरला मातेजवळ महीला मंडळाचे भजन, २० आक्टोबरला विद्यार्थी साठी वक्तृत्व स्पर्धा,२१ आक्टोबरला महा संग्राम २०२३ भव्य एकल व समुह नृत्य स्पर्धा, २२ आक्टोबरला होमहवन, २३ आक्टोबरला महाआरती, महा रक्तदान शिबीर व महाप्रसाद वितरण, २४ आक्टोबरला गोपाल काला, गरजू गरजवंत जनतेला मंडळाचे कडुन वस्त्रदान झालेल्या स्पर्धाचे बक्षीस वितरण दसऱ्या निमीत्य मातेला सुवर्ण दान व मातेचे विसर्जन हे उपक्रम कार्यक्रम मंडळ संपूर्ण दहा दिवस राबवित आहेत.

सोबत भगवान श्रीकृष्ण यांचे संपूर्ण जीवन चारीत्र देखावा सादर होत आहे. सोबतच दरवर्षा प्रमाणे गावात मेला लागणार असुन नानाविध सामानाचे स्टाल राहनार आहे. दर वर्षाला रत्नापुर येथे लाखोच्या संख्येनी भावीक भक्तगण उपस्थीत राहुन मातेच्या दर्शनासोबत या सर्व सादर होणाऱ्या कार्यक्रम उपक्रमाचा आस्वाद लाभ घेतात. या वर्षाला सुद्धा विदर्भातील संपूर्ण जनतेनी याचा आस्वाद घेवून लाभ घ्यावा असे आव्हान श्री. गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा माजी जी.प. सदस्य रमाकांत लोधे, उपाध्यक्ष संजय गहाणे, सचिव वामन जीवतोडे यांचेसह समस्त सभासद बंधु यांनी केलेले आहे. या संपूर्ण दहा दिवस गावात भक्तीमय वातावरण तयार होवून गावाला जत्रेचे रूप प्राप्त होणार आहे.

Latest Posts

Don't Miss