Latest Posts

गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल माओवाद्यास अटक

– महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण १६ लाख रुपयांचे बक्षीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलीस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात.

१४ ऑक्टोबर २०२३ रोजी जहाल माओवादी चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा (४८)  रा. टेकामेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) हा गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागातील कांकेर (छ.ग.) सिमेलगत असलेल्या पोस्टे जारावंडी व पोस्टे पेंढरी या दोन्ही पोस्टेची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते सोहगाव जाणा­या रोडवरील कूरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाचे जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. त्यास सन २०२३ साली मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. ००१३/२०२३ कलम ३०७, ३५३, १४३, १४८, १४९, १२० (ब) भादवी, ३/२५, ५/२७ भारतीय हत्यार कायदा, ३, ४  भारतीय स्फोटक कायदा, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा व १३, १६, १८ (अ) युएपीए ॲक्ट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.

अटक जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती – चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा

दलममधील कार्यकाळ
+ २६ जुन २००० ला पर्लकोटा दलममध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन २००२ कार्यरत.
+ सन २००२ ला एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन २००३ पर्यंत कार्यरत.
+ सन २००३ मध्ये डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सन २०१४ पर्यंत माड डिव्हीजनमध्ये कार्यरत.
+ सन २०१४ मध्ये डिव्हीसीएम पदावरुन डिमोशन होऊन एसीएम पदावर सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये काम केले.
+ सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये २६/११/२०१६ ला पुन्हा डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये उप-कमांडर या पदावर आजपर्यंत काम केले.

कार्यकाळात केलेले गुन्हे – चकमक- ७
+ सन २००९ मध्ये मौजा पुंगड (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
+ सन २००९ मध्ये मौजा बालेवाडा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
+ सन २००९ मध्ये मौजा बाशिंग (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक/ॲम्ब्युशमध्ये सहभाग.
+ सन २०१० मध्ये मौजा गरपा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
+ सन २०११ मध्ये मौजा कोल्हार (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक/ॲम्ब्युशमध्ये सहभाग.
+ माहे मे २०२० मध्ये मौजा पोयारकोठी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस अंमलदार शहिद झाले होते.
+ सन २०२३ मध्ये मौजा मौजा हिक्केर (म.रा.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
खुन १ – सन २०१० मध्ये मौजा कोंगाल जि. नारायणपूर (छत्ती.) येथील एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

शासनाने जाहिर केलेले बक्षीस- महाराष्ट्र शासनाने चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा याच्या अटकेवर १६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७१ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Latest Posts

Don't Miss