विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तात्पुरता फटाका साठवणुक व विक्री परवाना घेणाऱ्यांना सुचित करण्यात येते की, आगामी दिवाळी सणानिमित्य ज्यांना तात्पुरता फटाका साठवणुक व विक्री परवाना (पंधरा दिवसाच्या मुदतीकरीता) आवश्यकता आहे. त्यांनी जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयात २५ ऑक्टोबर २०२३ पूर्वी आपला अर्ज विहीत नमुण्यात सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. जिल्ह्यातील सर्व तात्पुरत्या फटाका साठवणुक व विक्री परवानाधारकांनी फटाका साठवणुक व विक्री परवान्यासाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.
संबंधित तहसिलदार, नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचायत यांनी अर्जदारांचे विनंती वरून Explosive Rules, २००८ मधील अटी व शर्ती तसेच शासनाद्वारे वेळोवेळी निर्गमीतकेलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून, तात्पुरत्या फटाका साठवणुक व विक्रीच्या नियोजीत स्थळाची सुरक्षिततेच्या दृष्टीने चौकशी करून संबंधितास नाहकरत प्रमाणपत्र निर्गमित करावे.
पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांनी अर्जदारास नियमानुसार चारीत्र्य प्रमाणपत्र निर्गमित करावे. Explosive Rules, २००८ नुसार पुढील मुद्दयांवर विशेष लक्ष देने आवश्यक आहे. फटाक्यांचे दुकान अग्नी प्रतिरोधक साहित्यापासून बनविलेले, बंद आणि सुरक्षित असावे. फटाका साठवणूक व विक्री दुकान एकमेकांपासून किमान तीन मिटर अंतरावर असावे आणि संरक्षित क्षेत्रापासून किमान पन्नास मिटर अंतरावर असावे. फटाक्यांचे दुकान समोरासमोर नसावे. दुकानात संरक्षित अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचे तेल, गॅस व खुल्या दिव्यांचा वापर करू नये, मात्र विद्युत दिव्यांचा वापर करतांना ते भिंतीला किंवा छताला लावलेले (फिक्स्ड) असावे आणि जिवंत विद्युत तारा (वायर) उघडया असू नयेत. प्रत्येक दुकानासाठी स्वतंत्र विद्युत स्विच असावी व सर्व दुकानात विद्युत पुरवठा नियंत्रीत करणारी एक स्वतंत्र मास्टर स्विच असावी. दुकानाच्या ५० मिटरच्या परिसरात अतिषबाजी प्रतिबंधीत राहील.
एका नियोजीत स्थळी ५० पेक्षा जास्त दुकाने लावू नये. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज (Form AE-५ मध्ये). पोलीस अधिक्षक यांचे कार्यालयातून तात्पुरता फटाका परवाना मंजूरीसाठी चारीत्र्य प्रमाणपत्र. संबंधित तहसिलदार यांचे कार्यालयातून तात्पुरत्या फटाका परवाना मंजूरीबाबत अहवाल व नाहरकत प्रमाणपत्र. संबंधित नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचायती यांचे फटाका विक्री व साठवणुकीची नियोजीत जागा सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असल्याचे नाहकरत प्रमाणपत्र (त्यात जमिनीचा स.न./मालमत्ता क्रमांक/घर क्रमांक नमुद करावे). ज्या जागेवर फटाका विक्री व साठवणूक करणार आहेत त्या ठिकाणच्या जागेचा/इमारतीचा अभिलेख. अर्जदाराचे आधार कार्ड व २ पासपोर्ट साईज फोटो. इमारत / खुली जागा स्वत:च्या मालकीची नसल्यास जमीन मालकाचे/घरमालकाचे संम्मतीपत्र.