विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : छत्तीसगड व तेलंगणा राज्यात होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियाच्या अनुषंगाने अवैध दारू वाहतुक याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी निर्देश केले.
त्या अनुषंगाने आज गोपनीय माहितीद्वारे माहिती प्राप्त झाली की, एका चार चाकी वाहनामधून विधानसभा निवडणुक होत असलेल्या छत्तीसगड राज्यात आष्टी मार्गे अवैध दारू वाहतुक होणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना प्राप्त झाली आता आष्टी फॉरेस्ट नाका येथे अधिकारी व अंमलदार यांच्यासह नाकाबंदी केली असता ४ वाजताच्या दरम्यान एक संशयित वाहन एमएच ३४ बीआर ६ हजार ५७० व्हॅन व त्याचा चालक सुनीलसिंह बैस रा चंद्रपूर हे मिळून आले.
नमूद वाहनास पंचासमक्ष चेक केले असता त्यामध्ये देशी- विदेशी दारू १ लाख २५ हजार ६०० रूपयांची व वाहन ४ लाख रुपये असा एकूण ५ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. यातील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कामगिरी ही पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पवार, अतुल तराळे, पो.हवा. करमे, पो.शि. नागुलवार, तोडासे, रायसिडाम, प्रवेश यांनी पार पाडली.