विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत गेदा अंतर्गत येत असलेल्या अतिसंवेदनशील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त मौजा ताडपल्ली- नाराणुर येते काल आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी कोंदावाही सभामंडप कार्यक्रम करून ताडपल्ली- नाराणुर या गावातील नागरिकांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान शिक्षण, रस्ता, नाली, पाणी, आरोग्य, सुविधासह इतर अनेक अडचनी बाबत चर्चा केले. त्यावेळी अजय म्हणाले की आपल्या गावातील समस्या असो कि, वयक्तिक समस्या असो मला संपर्क करण्यात यावी. मदतीचा हात देईन असे, ताडपल्ली गावातील नागरिकांना आश्वासन दिले.
यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी, तालुका सचिव प्रज्वल नागुलवार, माजी सरपंच प्रमोद आत्राम, सरपंच निलेश नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, रमेश वैरागडे, सरपंच नीलेश वेलादी, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक, संदिप कोरेतसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील पुरुष-महिला उपस्थित होते.