– अहमदनगर येथे आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीची सहविचार सभा वडसा येथे २१ ऑक्टोबर २०२३ ला संपन्न झाली. त्यात खाली नमूद मुद्द्यासह इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
२९ आॉक्टोंबर ला अहमदनगर येथे पार पडणाऱ्या राज्य महामंडळ सभेकरीता गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांच्या राज्यस्तरावरील प्रलंबित मागण्यांच्या निवेदनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर यांचे वतीने करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव रायसिडाम, प्राथमिक शिक्षक संघाचे मागदर्शक तथा जिल्हा सल्लागार गजानन पिपरे, भुजंगराव नारनवरे, प्राथमिक शिक्षक संघ कुरखेडाचे तालुकाध्यक्ष एकनाथ पिलारे, प्राथमिक शिक्षक संघ वडसाचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न झुरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका आरमोरीचे तालुका सरचिटणीस किशोर पिंपळकर, प्राथमिक शिक्षक संघ तालुका मुलचेराचे कार्याध्यक्ष तथा डि.सि.पि.एस.संघटना मुलचेराचे तालुकाध्यक्ष अशोक बोरकुटे, प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक तथा सल्लागार विश्वनाथ म्हस्के, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मागदर्शक तथा जिल्हा सल्लागार राजेश ऊईके, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा वडसाचे तालुका कोषाध्यक्ष देवचंद म्हस्के, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मागदर्शक तथा जिल्हासलागार सदानंद लांजेवार, कुरखेडा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस ए.ए. खाॅन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कुशल व धडाडीचे संघटक दुष्यंत मांडवे, कुरखेडा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेच्या सन्माननीय संचालिका तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा महिला संघटिका हेमलता कुमरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संघटक गायकवाड यांचेसह बहुसंख्य शिक्षक बंधु-भगिनी उपस्थित होते.