– माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांचा कडून पारितोषिक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (sironcha) : नवरोत्सव व बतकम्माच्या शुभपर्वावर क्रीडा संकुल येथे शनिवारी २१ ऑक्टोंबर रोजी गरबा-दांडिया नृत्य स्पर्धेची आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटन माजी जिल्हापरिषदीचे अध्यक्षा भाग्यश्री हलगेकर(आत्राम) यांच्या हस्ते पार पडण्यात आले असून प्रमुख अतिथी म्हणून सिरोंचा नगरपंचायतचे नगराध्यक्ष फरजाना शेख, उप विभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे, सिरोंचा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राठोड, API सुदर्शन काटकर, नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा, तालुका अध्यक्ष मधुकर कोलूरी, माजी नगर सेवक रवी रालाबंडीवार, नगरसेवक सतीश भोगे, नगर सेवक सतिश राचर्लावार, नगर सेवक रंजीत गागापूरवार, नगर सेविका सपना तोकला, नगर सेविका महेश्वरी पेद्दापल्ली, महिला जिल्हा उपाध्यक्ष वेंकट लक्ष्मी आरवेली, गणेश बोधनवार, एम.डी. शानु, माजी नगर सेवक विजय तोकाला, सिद्दिक शेख, मदनय्या मदेशी, अर्चना चकिनारपूवार, डॉक्टर हकीम व नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.
भाग्यश्री हलगेकर यांचा पारितोषिक व स्पर्धेचे आयोजन टायगर ग्रुप सिरोंचा यांचा वतीने कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आली. या वेळीपंधरा ग्रुपनी स्पर्धेत सहभागी नोंदविले. गरबा-दांडिया नृत्यासाठी प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये/द्वितीय पारितोषिक १५ हजार रुपये/तर तृतीय पारितोषिकेसाठी ९ हजार रुपये रोख रक्कम विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
या प्रसंगी माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्री हलगेकर (आत्राम) हे बोलत होते की, आपल्या भागातील युवती व महिलांना सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच महिलांचे सांस्कृतिक व कलेचे विकास व्हावे. यासाठीच शारदीय नवरात्रौ उत्सवाच्या शुभपर्वावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आणि सर्वांना विजय दशमीच्या सर्वांना शुभेच्छा यावेळी देण्यात आली. सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शनही केले आहेत.
विजेत्या ग्रुपाला माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्री हलगेकर (आत्राम) यांच्या हस्ते रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे मूल्यांकन अस्मिता पाटील (नागपूर) आणि राठोड सर (वर्धा) यांनी केली आहे. कार्यक्रमाचे संचालन साईल दळणे नागपूर यांनी तर स्पर्धेत यशस्वीतेसाठी, टायगर ग्रुप अध्यक्ष विशाल मादेशी, नगर सेवक रंजीत गागापूरवार, रेखा तिप्पटीवार, सोनेकर, कमलाकर तटिकोंडावार, टायगर ग्रुप उपाध्यक्ष सागर फकीर, रिषभ अलोणे, मनोज मादेशी, राजू अक्केला, दीपक दरशेट्टी, अक्षय सुम्पटम, सागर गंधाम, कार्तिक निम्माला, रघु उडता, सुमित अंकुदारी, आदर्श मादेशी, हर्षित पेराला, रोहित वालबोज, अभिनय मंथना, सुमित मौनील, मंथना नरेश, दुर्गम हर्षित, पेराला साई ,जगतापवार श्रीमन, कुम्मारी संदीप, अंकुदारी दीपक, राजशेकर मोट्टे, निखिल नरपका, आदींनी अतिक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी प्रेक्षकगण उपस्थित होते.