Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी दुर्गा मातेचे घेतले दर्शन

– मुलचेरातील विविध दुर्गा मंडळांना दिली भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : तालुक्यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केले जात आहे. २४ ऑक्टोबर रोजी दशमी निमित्याने माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी मुलचेरा तालुक्यातील विविध गावांतील दुर्गा उत्सवात हजेरी लावून दुर्गा मातेचे पूजा करत दर्शन घेतले.

मुलचेरा तालुक्यात पुनर्वसित बंगाली बांधवांची मोठी संख्या असून तालुक्यातील विविध गावात दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केले जाते. या वर्षी सुद्धा आकर्षक दुर्गा मूर्तीचे प्रतिष्ठापना करत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष शुक्रवारी दुर्गा उत्सवाला सुरुवात झाली असून दशमी पर्यंत हा उत्सव सुरू होता. पाच दिवसांच्या उत्सवात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत विविध कार्यक्रमांचा लाभ घेतात.

भाग्यश्री आत्राम आत्राम यांनी विवेकानंदपूर, सुंदरनगरसह आदी गावातील दुर्गा उत्सव मंडळांना भेट देऊन दुर्गा मातेचे आशीर्वाद घेतले. एवढेच नव्हेतर मंडळांच्या सदस्यांसोबत चर्चा केली. स्वतः या विविध कार्यक्रमासाठी लागणाऱ्या खर्चात हातभार लावला तसेच यापुढेही आर्थिक मदत लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंडळांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत –
माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचा मुलचेरा तालुक्यात प्रवेश होतच येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी मंडळाचे पदाधिकारी व उपस्थित गावकऱ्यांना नवरात्री व दसरा निमित्य शुभेच्छा दिले. विविध ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

Latest Posts

Don't Miss