Latest Posts

लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे पुरसलगोंदी व पेठा येथे जागतिक पोलीओ दिवस साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे मौजा पेठा व पुरसलगोंदी येथे जागतिक पोलीओ दिवस साजरा करण्यात आला.

मौजा पुरसलगोंदी येथे सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. ओमकार वरपल्लीवार (हेडरी उपकेंद्र), मंदा उराडे (परिचारिका पुरसलगोंदी उपकेंद्र), भुवनेश्वर पुराम (एमपीडब्लु) तसेच मौजा पेठा येथे प्रमुख पाहुण्या वनिता कोरामी (सरपंचा ग्रामपंचायत तोडसा) व प्रतिष्ठीत नागरिक, गावातील गावकरी, पालक तसेच लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाणचे अधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी जागतिक पोलिओ दिन साजरा केला जातो, प्रत्येक बालकाला या विनाशकारी आजारापासून वाचवण्यासाठी पोलिओ लसीकरणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि पालक, व्यावसायिक आणि स्वयंसेवकांच्या पोलिओ निर्मूलन करण्यासाठीच्या योगदानाला जागतिक पातळीवर साजरा करण्यासाठी जागतिक पोलिओ दिवस साजरा करण्यात येतो.

Latest Posts

Don't Miss