Latest Posts

वाघाच्या शिकारप्रकरणी सहा आरोपींना अटक : मरेगाव टाेली येथून घेतले ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिराेली (Gadchiroli) : चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात विद्युत प्रवाह साेडून वाघाच्या शिकार प्रकरणी वन विभागाने संशयीत सहा आराेपींना २६ ऑक्टाेबर राेजी अटक केली. पाच आराेपींना मरेगाव टाेली तर एकाला माेहटाेला येथून ताब्यात घेतले.

अमिर्झा गावालगतच्या जंगलातील कंपार्टमेंट नं ४१७ मध्ये जिवंत विद्युत तारेद्वारे वाघाची शिकार करण्यात आली हाेती. ही घटना २४ ऑक्टाेबर राेजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वन विभागाने चाैकशी अधिकारी नेमून या घटनेची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान २६ ऑक्टाेबर राेजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

यात प्रमोद मनोहर मडावी (२९), सुनील केशव उसेंडी (२८), दिलीप ऋषी उसेंडी (२८), प्रकाश दयाराम हलामी (४२), चेतन सुधाकर अलाम (२५) सर्व राहणार मरेगाव टाेली व नीलेश्वर शिवराम होळी रा. मोहटोला ता. जि. गडचिरोली आदी आराेपींचा समावेश आहे. आरोपींविरुध्द वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणाची चौकशी गडचिराेली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात चौकशी अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक (जंकास) संकेत वाठोरे हे करीत आहेत.

आराेपींकडून वाघाचे अवयव जप्त :
वन विभागाने अटक केलेल्या सर्व आराेपींकडून मृत वाघाचे पायाचे पंजे, नखे, दात व शिकारीसाठी वापरलेले अवजार कुऱ्हाड, सुरा आदी साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले. या प्रकरणात सखाेल चाैकशी सुरू असून आराेपींनी आणखी किती शिकारी केल्या याबाबतसुद्धा उलगडा केला जात आहे.

Latest Posts

Don't Miss