Latest Posts

समायोजनाची कार्यवाही तात्काळ करा : अन्यथा आंदोलनाचा इशारा 

– अधिकारी व कर्मचाऱ्यांना बिनशर्त वयाची अट शिथील करून रिक्त पदावर समायोजन करा व बजेट अधिवेशनात लोकप्रतिनिधींना दिलेले आश्वासन पूर्ण करा 

– आयटक संघटनेचे १७ फेब्रुवारी २०२२, १६ नोव्हेंबर २०२२, २० मार्च २०२३ तसेच १५ जून २०२३ निवेदन १९ जुलै २०२३
– आयटक संघटनेचे ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेली आंदोलनाची नोटीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : मागील १७ वर्षापासून अतिशय तुटपंज्या मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियांनाअंतर्गत कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी आपल्या जिवाची राखरांगोळी करत आरोग्य सेवा देत आहेत. नुकत्याच कोरोणा महामारीत आपल्या कुटूंबाची पर्वा न करता देवदूतासारखे कॉविड महामारीवर मात करण्यासाठी रात्रंदिवस आरोग्य सेवा दिलेली आहे. परंतु महाराष्ट्र शासन समायोजन देण्यास असमर्थ ठरत आहे.

सार्वजनिक आरोग्यमंत्री यांच्या कक्षात २० मार्च २०२३ रोजी बैठक झाली, त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विवीध संर्वगातील संपुर्ण कर्मचाऱ्याचे समायोजन करण्याकरीता लवकरच कार्यवाही करण्यात येईल तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

या बैठकीत वरील संघटनेकडुन मंत्री यांना ओडीसा, पंजाब, राजस्थान, मनिपुर तसेच महाराष्ट्रीतील विवीध विभागातील कंत्राटी कर्मचान्याच्या समायोजनाबाबत शासन निर्णय देण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सद्स्यानी तसेच इतर लोकप्रतीनिधानी शासनास व मंत्रीमहोदयास निवेदन सादर करून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील संपुर्ण कंत्राटी कर्मचाऱ्याचे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार राज्यातील रिक्त जागेवर समायोजन करण्याची विनंती केलेली होती. विधानसभेच्या बजेट क्षेत्रात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना शासनाने ३१ मार्च २०२३ पर्यंत समायोजन करण्यात येईल असे सांगीतले होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. डॉ. तानाजी सावंत यांनी ठाणे येथील कार्यक्रमात समायोजनाबाबत मुख्यमंत्री यांनी आपल्या कक्षात संबंधीत मंत्री व वरीष्ठ अधिकारी यांची बैठक बोलावून प्रश्न सोडवावेत अशी विनंती केली होती. तसेच वरील संघटनेनी सुध्दा आग्रहाची विनंती केली होती परंतु ६ महीणे होवून सुध्दा समायोजनाची कार्यवाही तसेच प्रलंबीत प्रश्नाबाबत कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचान्यात तिव्र असंतोष पसरलेला आहे. शासनाने समायोजनाबाबत तात्काळ सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रामविकास विभाग, वित्त व नियोजन विभागासह संबंधीत विभागातील मंत्री व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेवून समायोजनाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यात यावा, अशी विनंती वरील संघटना करीत आहे. त्याचा पाठपुरावा म्हणून १६ आक्टोबर २०२३ पासून वरील प्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या संबंगनिहाय संघटनांनी कृती समिती करून घेतलेला आहे.

एकच मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (एन.एच.एम. व एन.यु.एच.एम) शहरी व ग्रामिण कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे नियमीत रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय त्वरीत घेण्यात यावा.

आंदोलन दरम्यान उद्भवलेल्या परीस्थितीस समायोजन कृती समितीमध्ये सामिल कुठलीही संघटना जबाबदार राहणार नाही. त्याकरीता तात्काळ दखल घेवून शासनाने बैठक घेऊन लेखी स्वरूपात संघटनेला कळावे.

६ आक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असे म्हटले होते. परंतु सरकारला गांर्भियाने विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून १६ आक्टोबर २०२३ रोजी १ दिवसीय राज्यव्यापी आंदोलन नागपूर येथे संविधान चौक विधानभवनाजवळ इशारा आंदोलन करण्यात येईल. तसेच १७ ते २३ या कालावधीत राज्यातील जिल्हास्थरावर १ दिवसीय धरणे, मोर्चे व लेखनीबंद (डाटा एन्ट्री शासनास सादर केली जाणार नाही) आंदोलन करून निवेदन देण्यात येईल यावरुनही सरकारने दखल घेतली नाहीतर २५ आक्टोबर पासुन बेमुदत कामबंद आंदोलन व कार्यालयापुढे धरणे देण्यात येईल.

 

Latest Posts

Don't Miss