Latest Posts

महागांव विषबाधा प्रकरणात आणखी एका आरोपीस पोलीसांनी केले जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : महागांव येथील मागील एक महिण्याच्या कालावधीत शंकर कुंभारे यांचे परिवारातील त्यांच्यासह त्यांची पत्नी विजया कुंभारे, मुलगा रोशन कुंभारे, मुलगी कोमल दहागांवकर व साळी वर्षा ऊर्फ आनंदा उराडे या ०५ व्यक्तींचा अचानक मृत्यू झाल्याने संपुर्ण परिसरात खळबळ माजली.

संबंधीत गावातील व त्या परिसरातील लोकांकडून भुतबाधा, गुप्तधन यासारखे अनेक तर्कवितर्क व्यक्त करून संभ्रमावस्था निर्माण झाली. सदर घटनेची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळताच त्यांनी प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेवून पोलीस स्टेशन अहेरी व स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांचे विविध तपास पथके तयार करून सदर गुन्ह्राचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी सुदर्शन राठोड यांना सोपविला व संपुर्ण तपास पथकांच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवण्याकरीता अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांना निर्देशीत करून प्रकरणाच्या मूळापर्यंत शोध घेणेबाबत आदेशित केले.

प्रकरणाचे गांभीर्य बघून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम घेवून अवघ्या ४८ तासात मृतक व त्याचे इतर नातेवाईकांना अन्नपदार्थ व पेयातुन शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा रोशन कुंभारे व साळ्याची पत्नी रोजा प्रमोद रामटेके यांनी कट रचुन विष दिल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न करून पोलीस स्टेशन अहेरी येथे गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपीतांना अटक करून आरोपीतांच्या पोलीस कोठडी रिमांडकरीता मा. न्यायालयात हजर केले. प्रकरणाची पाश्र्वभुमी व गुंतागुंत बघून मा. न्यायालयाने आरोपीतांना १० दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला.

आरोपीतांच्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान आरोपींनी गुन्ह्रात वापरलेल्या विषाव्यतिरिक्त इतर दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारचे विष खरेदी केले होते. परंतु ते विष अन्नपदार्थात मिसळविल्यास अन्नपदार्थाची चव व रंग बदलत असल्याने त्यांनी ते विष अन्नपदार्थात मिसळविले नाही व पुढे मुंबई येथुन अतिघातक रासायनिक विष बोलावून ते शंकर कुंभारे व त्यांच्या परिवाराच्या अन्नपदार्थात मिसळविले. असे तपासात निष्पन्न होताच पोलीसांनी त्यांची तपासचक्रे वेगाने फिरवुन कशा पद्धतीने आरोपींनी विष मिसळविले ? याबाबत तपास केला असता असे लक्षात आले की, अटक आरोपी संघमित्रा रोशन कुंभारे हिच्या पुर्वाश्रमीचा असलेला मित्र अविनाश ताजणे, रा. खामगांव, जि. बुलढाणा याने विष खरेदी करण्याकरीता संबंधीत कंपनीस पैसे पुरविल्याचे निष्पन्न झाले.

अविनाश ताजणे व संघमित्रा कुंभारे हे त्यांचे शालेय जिवनापासून मित्रमैत्रिण असुन संघमित्रा कुंभारे हिचा रोशन कुंभारे यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही दिवस दुरावा निर्माण झाला. परंतु संघमित्रा कुंभारे ही उपचारार्थ तिचे माहेरी अकोला येथे गेली असतांना ती परत अविनाश ताजणे याचे संपर्कात येवून तिने तिच्या सासरच्या लोकांकडून होणा­या त्रासाबाबत त्याला सांगीतले. नजीकच्या काळात त्यांच्यातील संपर्क वाढल्याने संघमित्रा हिने तिच्या सासरच्या व्यक्तींना मारण्याची योजना अविनाश ताजणे यांस सांगून त्याची मदत मागीतली. तेव्हा अविनाश ताजणे याने संघमित्रा कुंभारे हिच्या सांगण्यावरून दोन वेळा विष खरेदी केले व ते विष खरेदी करण्याकरीता पैसे पुरविले असल्याचे तपासात निष्पन्न होताच तात्काळ एक तपास पथक अकोला, खामगांव परिसरात रवाना करून अविनाश ताजणे यांस ताब्यात घेवून सखोल विचारपुस केली असता त्याने गुन्ह्राची कबुली दिल्याने त्यांस २६ ऑक्टोबर २०२३ रोजी नमूद गुन्ह्रात अटक करण्यात आलेली असून मा. न्यायालयाने तपासातील प्रगती व गुन्ह्राचे गांभीर्य बघून पोलीस कोठडीत असलेले आरोपी संघमित्रा रोशन कुंभारे व रोेजा प्रमोद रामटेके यांना ०४ दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. त्याचप्रमाणे नव्याने अटक करण्यात आलेला आरोपी अविनाश ताजणे याची ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत ०४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व मनोज काळबांडे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड, पोलीस निरीक्षक बालाजी सोनवणे व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी केलेली आहे.

Latest Posts

Don't Miss