– एक कोटी रुपयांचा गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न
– मौजा-देवरी येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देवरी (Devri) : देवरी तालुका हा मागासलेला व अतिदुर्गम ओळखल्या जाणारा तालुका आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव राहतात. आदिवासी तळागाळातील दुर्बल व आर्थिक दृष्टयावंचित घटक व आदिवासी ची सांस्कृतिक टिकुण राहावी यासाठी देवरी येथे एक कोटी रुपयांचा गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृह मंजुर केला.याचा फायदा देवरी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांना होईल या निमित्ताने येथे दिल्या गेलेला सभागृह अतिशय महत्त्वाचा आहे. या सभागृहांत विविध धार्मिक कार्य, आदिवासी चे विविध कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम, या सभागृहांत होईल. यांचा निश्चित फायदा आदिवासी समाज बांधवांना होईल. या सभागृहांत आदिवासी संस्कृतीक संमेलन, मेळावे होतील या निमित्ताने आदिवासी सांस्कृतीचे जतन सुद्धा होईल असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना केले.
पुढे बोलतांना खासदार अशोक नेते यांनी देवरी येथे सांस्कृतिक सभागृह निश्चितच आशेचा किरण ठरणार आहे. सांस्कृतिक, धार्मिक सुविधांपासून वंचित राहिलेल्यांना प्रवाहात आणण्याचा सुकर मार्ग या द्वारे प्राप्त झाला असून आदिवासी समाजानी आपली संस्कृती जपावी. आदिवासी बांधवांनी शिक्षणाकडे वळून शिक्षणाच्या प्रवाहात येऊन वैयक्तिक व सामाजिक विकास साधावा.शिक्षण हा महत्वाचा घटक असुन् मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे. आदिवासी समाजासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत त्यांचा सुद्धा आपण चांगला लाभ घ्यावा. असे यावेळी वक्तव्य केल.
या कार्यक्रमाचे उद्घाटक ना.डॉ.विजयकुमार गावित साहेब आदिवासी विकास मंत्री, यांनी उद्घाटन स्थानावर बोलतांना आदिवासी समाजासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केली, आदिवासींच्या विकास कामांना गती व चालना देण्याचे काम हे केंद्र व राज्य सरकार करीत असून हे सरकार आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, प्रकल्प कार्यालय देवरी जि.गोंदिया च्या वतीने जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मंचावर प्रामुख्याने ना.डॉ.विजयकुमार गावित :
(मंत्री,आदिवासी विकास विभाग म.रा.) खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, माजी आमदार संजय पुराम, भंडारा, गोंदिया लोकसभेचे समन्वय विरेंद्र (बाळाभाऊ) अंजनकर,आदिवासी महामंडळाचे अध्यक्ष भारतसिंग दुधनाग, शिक्षण महर्षी तथा जेष्ठ नेते झामसिंग येरणे, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, तालुकाध्यक्ष प्रविण दहिकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, न.प. नगराध्यक्ष संजय उईके, न.प.उपाध्यक्षा प्रज्ञा संगीडवार, सभापती पं.स. अंबिका बंजार, अनिल बिसेन उपसभापती, कल्पना वालोदे जि.प.सदस्या, महेशजी जैन, आदिवासी नागरिक, बंधू आणि भगिनीं, विद्यार्थी, विदयार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.