Latest Posts

भाजप महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमांतर्गत दिवाळी पाडव्या निमित्य घर तिथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

– महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नियोजनात्मक बैठकीचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमांतर्गत दिवाळी-पाडव्या निमित्य घर तिथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन बेटी बचाव बेटी पढाव महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉ. शुभा फरांदे यांच्या आदेशानुसार, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पूर्व विदर्भ संयोजिका तथा महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया सविता पुराम यांच्या मार्गदर्शनात, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वात नियोजनात्मक बैठक जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून बेटी बचाओ, बेटी पढाओ ही योजना कार्यान्वित केली होती. महिला आणि मुलींचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या विविध योजनांच्या उपक्रमांचे प्रदर्शन करून एक सकारात्मक भूमीका जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता घर तिथे रांगोळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, अहेरी, वडसा व स्थानिक गडचिरोली शहरामध्ये घर तिथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेच्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसचे जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादित करणाऱ्या स्पर्धकाला राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.

यावेळी बैठक कार्यक्रमाला उपस्थित महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बेटी बचाओ, बेटी पढाओ पुर्व विदर्भ संयोजिका सविता पुराम व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी जेष्ट कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, जिल्हा सचिव लक्ष्मी कलंत्री, माधवी पेशेट्टीवार, रोशनी वरघंटे, वैष्णवी नैताम, ज्येष्ठ कार्यकर्त्या वच्छला मुंगाटे, पुष्पा करकाडे, माजी नगरसेविका अलका पोहनकर, लता लाटकर, रश्मी बानमारे, कविता किरमे, शिल्पा रॉय महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गीता हिंगे तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव वर्षा शेडमाके यांनी केले.

Latest Posts

Don't Miss