Latest Posts

सालेकसा तालुक्यातील विविध विकास कामांचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

– सालेकसा तालुक्यातील निंबा, बाकलसरा, जांभळी तसेच धानोली व बाम्हणी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : खा. अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नाने (५०५४) ट्रायबल हेड या विकास निधि अंतर्गत सालेकसा तालुक्यात अंदाजे- एक कोटी विस लक्ष रुपयाचे निंबा, बाकलसरा, जांभळी या रस्त्यांचे रुंदीकरणासह, मजबुतीकरण व डांबरीकरण रस्त्यांचे भूमिपूजन समारंभ सोहळा खा. अशोक नेते यांच्या हस्ते कुदळ मारून संपन्न झाला.

यावेळी उप कार्यकारी अभियंता महाजन, शाखा अभियंता मानकर, शाखा अभियंता कश्यप, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आदित्य शर्मा, दलित आघाडीचे जिल्हा महामंत्री राजेंद्र बडोले तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

त्यानंतर खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद बांधकाम विभाग गोंदिया यांच्या विकास निधि अंतर्गत सालेकसा तालुक्यातील चोविस लक्ष रुपयांचे धानोली बाम्हणी रस्त्यांचे भूमिपूजन समारंभ सोहळा खा. अशोक नेते यांच्या हस्ते कुदळ मारून संपन्न झाला.

सालेकसा तालुका हा अतिदुर्गम अविकसित म्हणून तालुक्याची ओळख आहे. अनेक वर्षापासुन विकास कामापासून वंचित सालेकसा तालुका होता. जनतेची अनेक दिवसापासून रस्त्यांच्या दुर अवस्थेमुळे, खराब रस्त्यांमुळे अनेकदा अपघात होऊन सायकलने सुद्धा जाणे नागरिकांना व विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत होती. आता ती अडचण नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर दूर झाली असून रेल्वे अंडर ग्राऊंड ब्रिज बनविण्यासाठी धानोली बाम्हणी व परिसरातील अनेक गावकरी मंडळानी निवेदन देण्यात आले. या संबधित रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ‌यांच्याशी सुद्धा चर्चा करून आपला निवेदन सादर करून बाम्हणी रेल्वे अंडर ग्राऊंड ब्रिज विषयी आपल्या मागणी साठी विशेष प्रयत्न केला जाईल. असा विश्वास देत आपली प्रतिक्रिया खा. अशोक नेते यांनी जनतेपुढे व्यक्त केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सालेकसा तथा पंचायत समिती सदस्य गुमानसिंग उपराडे, भाजपा आमगांव तालुकाध्यक्ष राजू पटले, पं. समिती सदस्या अर्चना मडावी, तालुका प्रभारी परसराम फुंडे, उपविभागीय अभियंता रवींद्र दमाये, शाखा अभियंता अमित परबत, ता. उपाध्यक्ष विकी भाटिया, युवा भाजपा नेते यशवंत मानकर, ता. महामंत्री मनोज बोपचे, ता. महामंत्री रामदास हतीमारे, संचालक कृ.उ.बा.स. हुकुम बोहरे, पोलिस पाटील शिला रहिले, माजी सरपंच रतन टेंभरे, माजी सरपंच भरत पटले, माजी सरपंच धनराज थेर, उपसरपंच उषा राऊत, कृष्णा कुरंजीकर, बलदेव चौधरी, विजय जैतकार तसेच कार्यकर्ते व मोठया संख्येने गावातील नागरिक बंधू आणि भगिनी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss