विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी \ बल्लारपूर : गुरु द्रोणाचार्य धनुर्वविद्येत पारंगत होते. ती विद्या शिकण्यासाठी एकलव्य आला. परंतु द्रोणचाऱ्यांनी एकल्व्याला धनुर्व विद्या शिकवली नाही. यामुळे तो निराश झाला. मात्र विद्या आत्मसात करण्याची मनोकामना एकल्व्यात निर्माण झाली.त्यांनी गुरुचा मातीचा पुतळा तयार करून धनूर्व विद्येत निपुण होऊन परंगात झाला. गुरू शिष्यांचे नाते यातून निर्माण झाले.यामध्ये गुरूने त्या शिष्याचा अंगठा मागला. यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही एकलव्याचा आदर्श जरूर घ्या, पण गुरु दक्षनिनेत अगंठा देऊ नका, असे मौलिक मार्गदर्शन माजी जि.प.सदस्य राम टोंगे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात समारोप कार्यक्रमात केले.