Latest Posts

येत्या काळात गडचिरोली हा महाराष्ट्रातील शेवटचा नाही पहिला जिल्हा होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली लोकसभा भाजपा उमेदवार अशोक नेते जी यांच्या प्रचारार्थ आयोजित भाजपा भव्य प्रचार सभेत उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबई ते गडचिरोली अंतर केवळ ९ तासांमध्ये पार करणे शक्य होईल. गडचिरोलीला महामार्ग, रेल्वे आणि विमानाने जोडण्याचे काम सुरू आहे. यासोबतच गडचिरोलीला जलमार्गाने जोडण्यासाठी नियोजन सुरू आहे. या विकासामुळे गडचिरोलीमध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात येत आहेत. येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. हे उद्योग येत असताना येथील जल, जमीन, जंगल आणि आदिवासींच्या आस्थांना धक्का लागणार नाही यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.

गडचिरोली येत्या काळात महाराष्ट्रातील शेवटचा नाही, पहिला जिल्हा म्हणून ओळखला जाईल. पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वात गडचिरोलीच्या या विकास यात्रेला गती देण्यासाठी अशोक नेते यांना गडचिरोलीकर रेकॉर्ड मतांनी समर्थनरूपी आशीर्वाद देऊन दिल्लीला पाठवतील हा विश्वास आहे.

यावेळी अशोक नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे महायुतीतील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss