Latest Posts

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सन २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती च्या मुला मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतर्गत विद्यार्थ्याकडून १२ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासन निर्णय ३० ऑक्टोंबर २०२३ अन्वये विद्यार्थ्याचे कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८ लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ७५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

Latest Posts

Don't Miss