Latest Posts

अकरा महसूल मंडळात अतिवृष्टी

– २३ जुलै रोजी यलो अर्लट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन प्रभावीत झाले होते. जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पुर आला असून काही भागातील वाहतुक रस्ते बंद केले आहेत. पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचा नागरिकांनी प्रयत्न करून नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने 23 जुलै रोजी यलो अर्लट दिला आहे. नदी किंवा पुलावरून पाणी वाहत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आजचे पर्जन्यमान –
22 जुलै रोजी सरासरी पर्जन्यमान आर्वी तालुक्यातील 6 मंडळात एकुण 32.7 मि.मी., कारंजा तालुक्यातील 4 मंडळात 114.0 मि.मी., आष्टी तालुक्यातील 4 मंडळात 49.5 मि.मी., वर्धा तालुक्यातील 7 मंडळात 29.5 मि.मी., सेलू तालुक्यातील 5 मंडळात 77.0 मि.मी., देवळी तालुक्यातील 6 मंडळात 31.2 मि.मी., हिंगणघाट तालुक्यातील 8 मंडळात 22.6 मि.मी. व समुद्रपूर तालुक्यातील 8 मंडळात 47.0 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 48 मंडळात एकुण 45.5 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली आहे.

अतिवृष्टी झालेली मंडळे –
कारंजा तालुक्यातील कारंजा 96.8, सारवाडी 67.0, कन्न्मवारग्राम 101.3, सेलू तालुक्यातील सेलू 67.8, हिंगणी 68.3, झाडसी 68.8, केळझर 70.8, सिंदी 109.3, तर समुद्रपूर तालुक्यातील गिरड 76.8 व खंडाळी 74.3 एकूण 11 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.

नद्यांची पाणी पातळी –
समुद्रपुर तालुक्यातील धाम नदीच्या हमदापूर येथील 224.80 पाणी पातळी क्षमता असून सध्याची पाणी पातळी 220.23 मीटर असून 410.47 क्युमेस विसर्ग सुरु आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट येथील 214.240 पाणी पातळी असुन सद्या 208.53 पाणी पातळी असुन 1 हजार 198.31 क्युमेस विसर्ग सुरु आहे. तर देवळी तालुक्यातील सिरपुर येथील पाणी पातळी 238.00 असुन सद्याची पाणी पातळी 230.05 मीटर असुन 243.742 क्युमेस विसर्ग सुरु आहे.

प्रकल्पाची पाणी पातळी –
बोर प्रकल्पाचा एकुण जलसाठा 134.542 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 45.79 टक्के, निम्न वर्धा प्रकल्पाचा 253.340 द.घ.ल.मी एकुण जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 56.63 टक्के, धाम प्रकल्पाचा 69.435 द.घ.ल.मी एकुण जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 64.40 टक्के, पोथरा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 38.420 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100.02 टक्के असून 159.490 क्युमेस विसर्ग सुरू आहे. पंचधारा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 9.680 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 59.20 टक्के, डोंगरगाव प्रकल्पाचा एकुण जलसाठा 4.810 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 58.02 टक्के, मदन प्रकल्पाचा 11.460 द.घ.ल.मी जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 58.35 टक्के, मदन उन्नई प्रकल्पाचा जलसाठा 3.720 द.घ.ल.मी असुन 100 टक्के, लालनाला जलसाठा 29.515 द.घ.ल.मी असुन 60.65 टक्के, वर्धा कार नदी प्रकल्प जलसाठा 25.962 द.घ.ल.मी असुन 97.59 टक्के व सुकळी लघू प्रकल्पाचा जलसाठा 11.920 द.घ.ल.मी असुन 59.95 टक्के भरलेले आहे.

इतर प्रकल्पाची पाणी पातळी –
नांद प्रकल्पाचा एकुण जलसाठा 62.182 द.घ.ल.मी असुन 49.42 टक्के, वडगाव प्रकल्पाचा जलसाठा 151.496 असुन 71.08 टक्के, उर्ध्ववर्धा प्रकल्प जलसाठा 678.270 असुन 49.28 टक्के व बेंबळा प्रकल्पाचा जलसाठा 203.330 असुन 45.32 टक्के भरलेले आहे.

जिल्ह्यात एकाही गावाचा संपर्क तुटलेला नसून समुद्रपूर तालुक्यातील उमरा ते हमदापूर रस्ता, उमरा ते भोसा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच समुद्रपूर तालुक्यातील भोसा सिंधी, भोसा खंडाळी मार्गावरील पुलावर व भोसा नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने बंद करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील धर्ती येथील पुलावर पाणी तसेच सावर्दोह गावाजवळील पुलावर पाणी व मुर्ती ते धर्ती पुलावर पाणी असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यात पावसाच्या पाण्याने 9 जनावरे वाहुन गेली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss