Latest Posts

दुर्गा-शारदा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia): दुर्गा-शारदा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाकरीता (सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था वगळून इतरांना) रोख रकमेच्या किंवा वस्तुच्या स्वरुपात कोणताही पैसा, वर्गणी किंवा देणगी गोळा करण्याकरीता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१-क नुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्त, गोंदिया यांची पुर्वपरवानगी घ्यावी. त्याकरीता www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन किंवा कार्यालयात ऑफलाईन अर्ज करुन सहाय्यक धर्मादाय आयुक्त, गोंदिया यांचेकडून परवानगी/ प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्जासोबत सादर करावयाचे आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे. अर्ज पुर्ण भरलेला असावा. मंडळाच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी असलेल्या ठरावाची प्रत. सर्व सदस्यांचे ओळखपत्र. जागेबाबत जमीन मालकाचे ना-हरकत, नगरपालिका/पंचायत समिती/ग्रामपंचायत यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे ना-हरकत पत्र. विद्युत बिलाची प्रत. १०० रुपये स्टॅम्प पेपरवर शपथपत्र. मागील वर्षाचे परवानगीची प्रत. मागील वर्षाचे जमा खर्चाचा हिशोब/ अंकेक्षण अहवाल.

कलम ४१-क च्या तरतुदीचे उल्लंघन करुन सहाय्यक धर्मादाय आयुक्त, गोंदिया यांची परवानगी न घेता पैसा, वर्गणी किंवा देणगी गोळा केल्यास व तसा दोष सिध्द झाल्यास तीन महिन्यापर्यंत साधा कारावासाची किंवा संकलीत रक्कमेच्या किंवा अंशदानाच्या दीडपटीपर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील. संबंधीत पोलीस विभागानी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, गोंदिया यांच्या परवानगीशिवाय पुढील मिरवणुकी व इतर बाबी बाबत परवानगी देवू नये. त्यामुळे सर्व मंडळांनी वर्गणी गोळा करण्यापुर्वी रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे, असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पजई यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss