Latest Posts

शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन भत्त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

– महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शिकाऊ उमेदवारांनी ३ जुन २०२१ पासुन शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे. किंवा सद्या प्रशिक्षण करीत आहे. अशा सर्व शिकाऊ उमेदवारांनी https://maps.dvet.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करुन त्यांचा महाराष्ट्र शिकाऊ  उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत दरमहा विद्यावेतन प्रापत करण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.एस. कुलकर्णी यांनी केले आहे.

शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कायद्यांतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहन  करण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना राज्यात राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन शिकाऊ उमेदवारांना शासनातर्फे अनुज्ञेय आहे. तथापि राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारांना अनुज्ञेय ठरणारा विद्यावेतनाचा लाभ एकत्रितपणे देय एकुण विद्यावेतनाच्या ७५ टक्के पेक्षा अधिक अनुज्ञेय ठरणार नाही.

महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी  प्रोत्साहन योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी पोर्टलवर नोंदणी अर्ज करण्याकरीता काही अडचणी असल्यास उमेदवारांनी संबंधीत आस्थापनाशी किंवा मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

सर्व संबंधीत आस्थापनांनी त्यांच्या अखत्यारितील प्रशिक्षण पूर्ण केलेले व करीत असलेल्या शिकाऊ उमेदवारांनी संकेत स्थळावर सादर केलेल्या विद्यावेतनाच्या अर्जाची तपासणी करुन मान्यता द्यावी, असे मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss