Latest Posts

मतदारांनो, १९ ऑक्टोबर पर्यंत करा मतदार नोंदणी : प्रजित नायर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहु नये यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

कोणत्याही पात्र मतदारांचे यादीत नाव नोंदवायचे शिल्लक राहीले असल्यास भारत निवडणुक आयोगाकडून मतदार यादीचा निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून १९ ऑक्टोबर पर्यंत व्होटर हेल्प ॲपवर मतदार नोंदणी करू शकतात. जिल्ह्यातील पात्र मतदारांचे वय १ जुलै २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण झालेले असेल त्यांनी संबंधित विधानसभा मतदार संघाच्या यादीत आपले नाव नोंदणी करून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अजुनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविले नाही त्यांनी Voter Help App चा वापर करून आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासू शकतात, तसेच अधिक माहितीसाठी १९५० या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकतात. मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री मतदारांनी करावी. मतदानाकरिता आलेल्या मतदाराचे नांव मतदार यादीत असल्यास त्यांनी एकूण १२ प्रकारचे ओळखीचे दस्तावेज/ ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर केल्यास त्यांना मतदान करता येईल. आयोगाने निर्देशित केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल कार्यालयाचे पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, लोकसंख्या नोंदणी अंतर्गतचे स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, छायाचित्र असलेले निवृत्ती विषयक कागदपत्र, छायाचित्र असलेले शासकीय ओळखपत्र, संसद/विधानसभा/विधान परिषद सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, युआयडी कार्ड या १२ प्रकारच्या ओळखपत्राचा समावेश आहे.

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी कुठल्याही निवडणूक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर किंवा Voter Helpline या ॲपवर अत्यंत सुलभतेने नाव असल्याची खात्री करता येते.

Latest Posts

Don't Miss