Latest Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : मुल येथे अवैद्य दारू वाहतूक विरोधात कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर(Chandrapur) : विधानसभा निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने पेट्रोलिंग दरम्यान १० पेटी दारू सहित स्कॉर्पिओ वाहन मुद्देमाल ५ लाख ३५ हजार रूपयाचा माल हस्तगत केले.

१७ ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. मुल हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली देवानंद बुरांडे रा. सुशी ता. मुल हा सुशी जानाळा मार्गे अवैधरित्या दारु वाहतुक करीत आहे, अशी खात्रीशीर माहीतीवरुन जाणाळा सुशी मार्गावर नाकाबंदी करुन वाहन पकडले असता वाहनामध्ये देशी दारू रॉकेट संत्राच्या १० पेटी एकूण १ हजार नग ९० एमएल मिळुन दारूची किंमत ३५ हजार रुपये व महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन ५ लाख रुपये असा एकूण ५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त करण्यात आला.

आरोपी विरुध्द पो.स्टे.मुल येथे कलम ६५ (अ ) म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखे चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर, पोउपनि मधुकर सामलवार, पो हवा. नितीन साळवे, सुभाष गोहोकार, पोशि मिलींद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केले.

 

Latest Posts

Don't Miss