Latest Posts

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे : निवडणूक निरीक्षक जय प्रकाश सिंग

– निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : निष्पक्ष व मुक्त वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निरीक्षक जय प्रकाश सिंग यांनी केले. सोमवार ४ नोव्हेंबर २०२४ ला निवडणुक निरीक्षक जय प्रकाश सिंह यांचे उपस्थित ४४- आर्वी विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास सिव्हिजिलचा वापर करून आपल्या तक्रारी आपण नोंदवू शकता असे त्यांनी सांगितले.

सदर बैठकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास शिरसाट यांनी उमेदवारांना आदर्श आचारसंहितेचे पालन करतांना काय करावे व काय करू नये, प्रचारासाठी आवश्यक परवानगी व त्या मिळवण्यासाठी एक खिडकीबाबत तसेच भारत निवडणूक आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या सुविधा पोर्टल व सुविधा ॲप बद्दल माहिती दिली.

निष्पक्ष व मुक्त वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निरीक्षक जय प्रकाश सिंग यांनी केले. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी हरीष काळे तहसिलदार आर्वी,  हंसा मोहणे तहसिलदार आष्टी व  ऐश्वर्या गिरी तहसिलदार कारंजा घा. तसेच उमेदवार व उमेदवराचे प्रतिनिधी हजर होते.

 

Latest Posts

Don't Miss