Latest Posts

रेल्वेच्या धडकेत सांबराचा मृत्यू : तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर हेटी बिटातील डोर्ली रीटातील पाण्याच्या बोळी जवळील परिसरात गोंदिया बल्लारपूर रेल्वे मार्गावर काल रात्री १० वाजताच्या दरम्यान मालगाडी रेल्वेने धडक दिल्यामुळे एका सात ते आठ वर्षे वयाच्या नर सांबराचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

या रेल्वे मार्गावर सतत रेल्वेच्या धडकेमध्ये वन्यजीवांचे जीव जाणे हे नित्याचीच बाब ठरली असून, काही दिवसापूर्वी यापूर्वी सुद्धा २ नोव्हेंबर ला गंगासागर हेटी बीटातील कक्ष क्रमांक ९७ लगत चंद्रपूर – ब्रह्मपुरी रेल्वे मार्गावरील रेल्वेने दिलेल्या धडकेमुळे एक अंदाजे तीन वर्षे वयाची मादा चा मृत्यू झाला होता. ३१ जुलै ला याच परिसरात रेल्वे मार्गावर मालगाडीच्या धडकेत रानगवा ठार झाला होता. या रेल्वे मार्गावर आता पर्यंत एक वाघ, एक अस्वल तर अर्जुनी मोरगाव येथे अस्वल तर काही दिवसांपूर्वी घटनास्थळापासून काही अंतरावरच रेल्वेच्या धडकेमध्ये ५ चितळ मृत झाल्याच्या घटना उघडकीस आली होती.

मृत्यू सांबराचा शवविच्छेदन शालिनी लोंढे पशुसंवर्धन विकास अधिकारी सिंदेवाही यांनी केला. व त्यानंतर मृत सांबराला पुरण्यात आले. यावेळी तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड, वनरक्षक राजेंद्र भरणे, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, नितीन भेंडाळे, शुभम निकेशर, गौरव निकूरे, पिआरटी सदस्य, व वनमजूर इतर उपस्थित होते.

मिंडाळा ते चंद्रपूर पर्यंत जवळपास शंभर किलोमीटर पर्यंत घनदाट जंगलातून ब्रह्मपुरी- चंद्रपूर हा रेल्वे मार्ग गेलेला आहे त्यामुळे या रेल्वे मार्गावर सतत अशाप्रकारे वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना रेल्वे धडके मध्ये घडत असतात. तरी यांना टाळण्याकरिता  वन विभाग, रेल्वे प्रशासन, व शासनाने उपाय योजनेत करणे गरजेचे असून. प्राण्यांना रेल्वे खालून ये जा करण्याकरता काही मीटर अंतरावर अंडरपास असणे गरजेचे आहे यामुळेच वन्यजीव मृत्यूच्या घटनावर नियंत्रण मिळवता येईल. असे यश कायरकर वन्यजीव अभ्यासक यांनी म्हंटले आहे.

Latest Posts

Don't Miss