Latest Posts

सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींकरिता १७ मार्चला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या,सुशिक्षित बेरोजगार, नोकरीइच्छुक आणि गरजू युवक व युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि करंजेकर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साकोली तालुका साकोली जिल्हा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने १७ मार्च २०२५ रोजी करंजेकर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नागझिरा रोड, साकोली तालुका साकोली जिल्हा भंडारा या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून ८०० पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तरी सर्व युवक व युवतींनी सदर रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सदरचा गुगलफॉर्म भरून  युवतींनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन रोजगाराच्या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुधाकर झळके, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांनी केले आहे.

– मेळाव्याचा दिनांक :- १७ मार्च २०२५
– वेळ :- सकाळी ११.०० ते दु. २.००
– मेळाव्याचे ठिकाण :- करंजेकर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नागझिरा रोड साकोली तालुका साकोली जिल्हा भंडारा
–  मेळाव्यात सहभागी होण्यासाठी गुगलफॉर्म लिंक : https://forms.gle/s2HXodFxvSBKkwaB6
अधिक माहितीसाठी संपर्क : श.क. सय्यद मो. ७६२०३७८९२४

Latest Posts

Don't Miss