Latest Posts

जूना पॉवर हाऊस येथे बुद्ध जयंती संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : २३ मे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता लुंबिनी बुद्ध विहार जूना पॉवर हाऊस विसापूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेच्या वतीने २०६८ व्या बुद्ध जयंती प्रित्यर्थ दर पौर्णिमेला घेतो त्याचप्रमाणे सुत्तपठणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध तसेच प.पू.बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या फोटोला किशोर तेलतुंबडे जिल्हाध्यक्ष व देशभ्रतार साहेब यांनी पुष्पमाला अर्पण केली. मेजर प्रफुल भगत, उपाध्यक्ष संरक्षण व मेजर गुरुबालक मेश्राम, कोषाध्यक्ष यांनी मेणबत्ती,अगरबत्ती प्रज्वलीत केली. त्यानंतर सामुहीक त्रिसरण, पंचशील, भिम स्मरण,भीम स्तुती सुत्तपठण घेण्यात आले. त्यनंतर समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात आली. उपस्थितांना अशोक पेरकावार लैफ्ट कर्नल यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन किरणताई तेलतुंबडे, तालुका कार्यकारिणी सदस्या यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुबालक मेश्राम यांनी केले. कार्यक्रमास संजय वानखेडे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा विसापूर, संकेत जयकर संरक्षण सचिव बादल देशभ्रतार व त्यांचा परिवार संध्या भगत तसेच विसापूर  परिसरातील उपासक व उपासिका समता सैनिक दलाचे सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Latest Posts

Don't Miss