विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (bhandara) : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणुकीकरिता वाचा अन्वये निवडणुकीची अधिसूचना मा. भारत निवडणूक आयोगाद्वारे प्रसिध्द करण्यात आली असून तात्काळ प्रभावाने आचार संहिता लागू झालेली आहे. आणि मतदानाचा १९ एप्रिल २०२४ आणि मतगणना ०४ जून २०२४ ला होणार आहे.
त्यानुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर भंडारा फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ४ जून २०२४ या कालावधीकरिता तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षाचे परिसरात आणि ४ जून २०२४ ला मौजा पलाडी, पो-आमगाव, तहसिल-जिल्हा-भंडारा येथे ११-भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतमोजणी केंद्राचे ठिकाणी २०० मीटर परिसरातील कोणत्याही सार्वजनिक व खाजगी जागेमध्ये खालीलप्रमाणे कृती करण्यास प्रतिबंध करीत आहे. ०४ जून २०२४ ला मोजा पलाडी, पो. आमगाव, तह-जिल्हा-भंडारा येथे होणार आहे. केंद्राचे ठिकाणी २०० मिटर परिसरातील कोणत्याही सार्वजनिक व खाजगी जागेमध्ये खालीलप्रमाणे कृती करण्यास प्रतिबंमतमोजणी केंद्राचे ठिकाणी अशी शासकीय सूचनेव्यतिरीक्त अन्य कोणतीही सूचना किंवा खूण प्रदर्शित करता येणार नाही.
मतमोजणी केंद्राचे ठिकाणी किंवा त्याच्या प्रवेशव्दाराजवळ किंवा त्याच्या आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक व खाजगी जागेमध्ये ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यासारखं मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो तसाच्या तसा ऐकवणारा उपकरणसंच वापरता किंवा चालवतो देणार नाही. प्रतिबंधीत क्षेत्रापेक्षा अधिक अंतरावरुन ध्वनिक्षेपकाचा वापर केला जात असेल तरीही त्यामुळे मतमोजणी केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि इतर व्यक्तीच्या कामात अडथळा येत असेल तर ती सुध्दा अपराध समजण्यात येईल.
मतमोजणी केंद्रात वाहतुकीसंबंधी निश्चीत केलेल्या वाहन पाकॉंग, ट्राफीक इ. बाबत निबंधोत केलेल्या ठिकाणापासून २०० मिटर त्रिज्येच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे वाहन आणता येणार नाही. एस टी टायर पासून २०० मिटर क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रापासून २०० मिटर त्रिज्येच्या परिसरात हॉटेल, टेलीफोन बुथ, झेरॉक्स मशीन, फेरीवाले यांना व्यवसाय करता येणार नाही.
मतमाजेणी केंद्रात मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप इ. इलेक्ट्रिक उपकरणे घेवून जाता येणार नाही. प्रेस शिवाय इतर कोणालाही व्हिडीओ कॅमेरा घेवून जाता येणार नाही. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश देता येणार नाही. मतमोजणी केंद्रापासून २०० मिटर त्रिज्येच्या परिसरात मंडप उभारण्यास तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना बसण्यासाठी टेबल व खुर्चा इत्यादी लावण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदरचा आदेश मौजा पलाडी, पो-आमगाव, तह-जिल्हा-भंडारा येथे मतमोजणी केंद्राचे ठिकाणी क ०४ जून २०२४ ला ००.०१ वाजतापासून ते २४.०० वाजतापर्यत अमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं. संहिताचे कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कळविले आहे.