Latest Posts

१ फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ६ नियम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशामध्ये 1 फेब्रुवारी 2024 पासून आर्थिक बाबींशी संबंधित काही नियम बदलणार असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे या नियमांबद्दल माहिती असणे खूपच महत्त्वाचे आहे.
जानेवारी संपायला आणि फेब्रुवारी सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. एक फेब्रुवारीपासून एनपीसी, आयएमपीएस, एसबीआय होम लोन, पंजाब आणि सिंध बँकेची स्पेशल एफडी, एसजीबी यांसह 6 नियमांमध्ये बदल होणार आहेत.

फास्टॅग केवायसी –
31 जानेवारी 2024 नंतर ज्यांचे केवायसी पूर्ण झालेले नसेल, असे फास्टॅग बंद किंवा काळ्या यादीत टाकले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाचे उल्लंघन करून एका वाहनाला अनेक फास्टॅग जारी करण्यात येत आहेत. केवायसीशिवाय हे फास्टॅग जारी करण्यात आल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरण्याचा किंवा एखाद्या वाहनाला अनेक फास्टॅग वापरण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे तुम्हीही फास्टॅग केवायसी अपडेट केले नसेल, तर ते 31 जानेवारीपूर्वी करून घ्यावे.

पंजाब आणि सिंध बँक स्पेशल एफडी –
पंजाब आणि सिंध बँकेचे ग्राहक 31 जानेवारी 2024 पर्यंत धन लक्ष्मी 444 डे एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. देशांतर्गत मुदत ठेव अकाउंट उघडण्यासाठी पात्र असलेले सर्व निवासी भारतीय, एनआरओ/एनआरई ठेव खातेधारक हे धनलक्ष्मी नावाची स्पेशल एफडी उघडण्यासाठी अर्ज करू शकतात.

एसबीआय होम लोन –
एसबीआयद्वारे एक विशेष होम लोन मोहीम चालवली जात असून, याअंतर्गत बँकेच्या ग्राहकांना 0.65% पर्यंतच्या गृहकर्जावर सूट मिळू शकते. तसेच प्रक्रिया शुल्क आणि गृह कर्जावरच्या सवलतीची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 असून ही सूट सर्व गृहकर्जांसाठी वैध आहे. हा लाभ 1 फेब्रुवारी 2024 पासून घेता येणार नाही.

आयएमपीएस नियम बदलणार –
आता 1 फेब्रुवारी 2024 पासून तुम्हाला कोणत्याही लाभार्थीचे नाव न जोडता थेट बँक अकाउंटमध्ये 5 लाख रुपये ट्रान्स्फर करण्याची परवानगी मिळणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बँक अकाउंटसंबंधी व्यवहार जलद आणि अधिक अचूक करण्यासाठी आयएमपीएस सेवा सुव्यवस्थित केली आहे. एनपीसीआयनुसार, आता तुम्ही फक्त लाभार्थ्याचा फोन नंबर आणि बँक अकाउंट नेम टाकून पैसे पाठवू शकता.

एसजीबीसंबंधी महत्त्वाचे –
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2023-24 या आर्थिक वर्षातली सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना (एसजीबी) जारी करणार आहे. एसजीबी 2023-24 मालिका IV म्हणून ती ओळखली जाणार आहे. ही योजना 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होऊन 16 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.

एनपीएसमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल –
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एनपीएसमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हा नवा नियम 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार, एनपीएस खातेधारकाला एकूण जमा झालेल्या रकमेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. यामध्ये खातेदार आणि नियोक्ता दोघांकडून भरण्यात येणाऱ्या रकमेचा समावेश असेल.

Latest Posts

Don't Miss