Latest Posts

उद्यापासून १० वी च्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : दहावी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोटी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट (Hall Ticket) बुधवारपासून ऑनलाइन उपलब्ध करून दिले जणार आहे.

विद्यार्थी ३१ जानेवारीपासून आपले हॉल तिकीट ऑनलाइन मिळवू शकणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिवांनी याबाबत माहिती दिली आहे.

माहितीनुसार, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ जानेवारीपासून हॉल तिकीट मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत हे हॉल तिकीट मिळणार आहेत. अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव यांनी दिली आहे. राज्य मंडळाकडून दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शाळांना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्याच्या सूचना –
शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर बुधवारपासून दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने हे हॉल तिकीट काढता येईल. मंडळाने दिलेल्या स्कूल लॉगिन मध्ये हे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध असेल. दहावीच्या परीक्षेसाठी सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून द्यायचे आहेत. हॉल तिकीट प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. तसेच त्या हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रात्यक्षिकांमध्ये मिळालेले गुण ऑनलाईन समाविष्ट होणार –
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्य शिक्षण मंडळाने यंदा प्रथमच प्रात्यक्षिकांचे गुण ओएमआर गुणपत्रिकांऐवजी ऑनलाईन भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रात्यक्षिकांमध्ये मिळालेले गुण ऑनलाईन पद्धतीने गुणपत्रिकेत समाविष्ट होणार आहे. या निर्णयामुळे शाळांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसणार आहे. त्यामुळे आता शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहे.

बोर्डाच्या परीक्षांसाठी १० मिनिटे जास्तीचा वेळ –
या वर्षी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १० मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाणार आहे. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि प्रश्न समजून घेण्यासाठी हा वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून या निर्णयाबाबतची माहिती दिली आहे. यामुळे दोन तासांचा पेपर २.१० तासांचा होईल आणि ३ तासांच्या पेपरसाठी ३.१० मिनिटांचा वेळ दिला जाईल.

Latest Posts

Don't Miss