Latest Posts

१२ – गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान विजयी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : १२ – गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ६ लाख १७ हजार ७९२ मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहिर केला. डॉ. किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी उपस्थित होत्या. शासकीय कृषी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया झाली. अन्य उमेदवारांना प्राप्त मते – अशोक नेते, भारतीय जनता पार्टी ४ लाख ७६ हजार ९६, योगेश गोन्नाडे बहुजन समाज पार्टी १९ हजार ५५, धीरज शेडमागे जनसेवा गोंडवाना पार्टी २ हजार १७४, बारीकराव मडावी बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी २ हजार ५५५, सुहास कुमरे भीमसेना २ हजार ८७२, हितेश पांडूरंग मडावी वंचित बहुजन आघाडी १५ हजार ९२२, करण सयाम अपक्ष २ हजार ७८९, विलास कोडापे अपक्ष ४ हजार ४०२, विनोद मडावी अपक्ष ६ हजार १२६, नोटा १६ हजार ७१४, एकूण वैध मते ११ लाख ६६ हजार ४९७.

Latest Posts

Don't Miss