Latest Posts

गडचिरोली जिल्ह्यातील कृषि पंपाना दिवसा १२ तास विज पुरवठा सुरु

– आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी (Armori) : आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त असुन मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतातील पिकांचे ओलीत करतांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत होता. वन्यप्राणी व जंगली श्वापदांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी व शेतमजूरांचा बळी सुद्धा गेला. त्यामुळे शेतकऱ्यांकडुन कृषिपंपांना दिवसा १२ तास विज पुरवठा करण्याची पोटतिडकीने मागणी होत होती.

सदर मागणीची आमदार कृष्णा गजबे यांनी तेवढ्याच तत्परतेने दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांची मुंबई येथे भेट घेत कृषि पंपाना दिवसा १२ तास विज पुरवठा करण्याची आग्रही मागणी केली. त्या मागणी व पाठपुराव्यामुळे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील कृषि पंपाना २८ नोव्हेंबर २०२३ पासुन पुढील आदेशापर्यंत सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिवसा १२ तास विज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजित पवार यांचे आमदार कृष्णा गजबे यांनी आभार व्यक्त केले.

सदर निर्णयामुळे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Latest Posts

Don't Miss