विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : किमान आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२४-२५ मध्ये शासन निर्णयानूसार राज्यातील बिगर आदीवासी क्षेत्रात फक्त एफ.ए.क्यु दर्जाचे धान व भरडधान्य ज्वारी, बाजरी, मक्का व रागी खरेदी करण्याकरीता पणन महासंघ मुंबईची मुख्य अभिकर्ता धान खरेदी संस्था म्हणून नेमणूक केली आहे. जिल्हा धान खरेदी समन्वय समितीने नागपूर जिल्ह्यात १८ धान व ४ भरडधान्य खरेदी केंद्राना मान्यता दिली आहे.
जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र या प्रमाणे आहेत. रामटेक तालुका- सह. खरेदी विक्री संस्था मर्या रामटेक, सहयोग सुशिक्षित बेरोजगार संस्था घोटीटोक, मौदा- कल्पना सह भात गिरणी मर्या. महादुला,रेवराळ, चाचेर, निमखेडा, खात, सह. खरेदी विक्री संस्था मर्या मौदा, जय किसान बेरोजगार सहकारी संस्था, धानोली, सोहम सुशिक्षित बेरोजगार संस्था इजनी, खर्डा, आदर्श सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था निहारवाणी, उमरेड तालुका -विकास खंड तालुका सहकारी खरेदी विक्री सस्था मर्या उमरेड, भिवापूर तालुका- सहकारी खरेदी विक्री संस्था मर्या भिवापूर, कुही तालुका- विजय सहकारी राईस मिल वेलतुर, श्री साई कृपा सुशिक्षित बेरोजगार संस्था कुही (चिपडी), पारशिवनी तालुका- खड विकास संस्था पारशिवनी (डुमरी), आदर्श ग्राहक सहकारी संस्था पारशिवनी(खेडी),
ज्वारी व मका भरडधान्य खरेदी करणाऱ्या संस्था –
काटोल तालुका- सहकारी खरेदी विक्री संस्था मर्या. काटोल, कळमेश्वर तालुका सहकारी खरेदी विक्री संस्था मर्या कळमेश्वर, नरखेड तालुका- सहकारी खरेदी विक्री संस्था मर्या नरखेड, सावनेर तालुका- सहकारी खरेदी विक्री संस्था मर्या. सावनेर असे आहेत. १८ धान खरेदी व ४ भरडधान्य केंद्राना धान खरेदी पुर्वतयारी म्हणून शेतकरी नोदणीसाठी मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळच्या नमुद खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. नोंदणी करण्याकरीता स्वत:चे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, चालू हंगामातील पीक पेरा नमूद सातबारा, नमूना आठ-अ, सामाईक सातबारा क्षेत्र असल्यास इतरांचे आधारकार्ड सह संमती पत्र, अद्यावत बँक पास बुक झेरॉक्स आदी कागदपत्रासह नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.