Latest Posts

राज्य मराठी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत चंद्रपूर केंद्रावर सादर होणार १८ नाटके

– २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर नाट्यरसिकांसाठी पर्वणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून आयोजित ६२ व्या हौशी  मराठी अंतिम नाट्य स्पर्धेची चंद्रपूर केंद्रावरील प्राथमिक फेरी २० नोव्हेंबर  ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. यावर्षी या स्पर्धेत चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वणी येथील १८ नाटकांची मेजवानी नाट्यरसिकांना मिळणार आहे.

२० नोव्हेंबर रोजी हम चंद्रपूर या संस्थेचे द कॉन्शन्स, २१ नोव्हेंबर रोजी कामगार मनोरंजन केंद्र उर्जानगर यांचे यक्षप्रश्न, २२ नोव्हेंबर रोजी अंजना उत्तम बहुद्देशीय संस्था चिखलगाव वणी या संस्थेचे सदूचे लग्न, २३ नोव्हेंबर रोजी कलारसिक यवतमाळ या संस्थेचे कशात काय लफडयात पाय, २४ नोव्हेंबर रोजी मास्क क्रिएटिव्ह कल्चरल क्लब यवतमाळ या संस्थेचे चेतना चिंतामणीचे गाव ..मैत्र जीवांचे, २५ नोव्हेंबर रोजी माधव शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर या संस्थेचे अंधाधुंद, २६ नोव्हेंबर रोजी  कलाश्रय ज्ञान व कला संवर्धन मंडळ यवतमाळ या संस्थेचे रुपायन, २७ नोव्हेंबर रोजी रसिकाश्रय सांस्कृतिक व कला बहुद्देशीय संस्था यवतमाळ या संस्थेचे छुमंतर, २८ नोव्हेंबर रोजी नवोदिता चंद्रपूर या संस्थेचे जेंडर अन आयडेंटिटी, २९ नोव्हेंबर रोजी पंचमवेद बहुद्देशीय संस्था यवतमाळ या संस्थेचे ग्रीष्मदाह, ३० नोव्हेंबर रोजी नाट्यरंग चंद्रपूर या संस्थेचे लाडू, १ डिसेंबर रोजी सागर झेप बहुद्देशीय संस्था वणी यांचे अजूनही चांदरात आहे, २ डिसेंबर रोजी सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर या संस्थेचे द  फियर फॅक्टर, ३ डिसेंबर रोजी साऊली बहुद्देशीय संस्था यवतमाळ यांचे बॅलन्स शीट, ४ डिसेंबर रोजी श्री साई व्यंकटेश्वरा बहुद्देशीय संस्था यवतमाळ या संस्थेचे अजूनही चांदरात आहे, ५ डिसेंबर रोजी सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर या संस्थेचे काळ्या दगडावरची रेघ, ६ डिसेंबर रोजी युवा कला सांस्कृतिक बहुद्देशीय शिक्षण संस्था वर्धा यांचे गगनभेद, युवा शहीद भगतसिंग बहुद्देशीय  संस्था चंद्रपूर यांचे अशी पाखरे येती अशी १८ नाटके या स्पर्धेत सादर होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी नमूद केले आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक  चवरे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss