Latest Posts

२३ फेब्रुवारीला चिंचोली (बु.) येथे उर्स आणि दुय्यम कव्वालिच्या कार्यक्रमाचे आयोजन

– हजरत सय्यद मोहम्मद इक्बाल शाह बाबा यांचा उर्स च्या निमित्याने देसाईगंज येथून निघणार संदल मिरवणूक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज (Desaiganj) : अल्हाज हजरत सय्यद मोहम्मद इक्बाल शाह बाबा यांचा १९ वा उर्स दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुधा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. येत्या २३ फेब्रुवारी २०२४ रोज शुक्रवार ला चिंचोली बुजुर्ग तालुका ब्रम्हपुरी या ठिकाणी रात्रौ ठीक ८ वाजता अम्मा साहेब आणि शफी बाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वार्षिक उर्स आणि मान्यवरांचे सत्कार आणि शानदार दुय्यम कव्वाली चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

२३ तारखेला देसाईगंज येथून भव्य संदल मिरवणूक निघणार आहे. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडीया, आमदार क्रुश्ना गजबे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार मनोहर चंद्रिकापूरे, वरोरा येथील माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, तुषार सोम भाजपा, ओबीसी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सतीश वारजुरकर, माजी आमदार अतुल देशकर, किशन नागदेवे माजी जिल्हा अध्यक्ष गडचिरोली भाजपा, विनोद संकत, शंकरलाल अग्रवाल चंद्रपूर, उद्योगपती भाश्कर डांगे, राकेश जयस्वाल, राष्ट्रवादी नेते नाना नाकाडे, डॉ. नामदेव कीरसान, महेंद्र ब्राम्हणवाडे, तहेसिलदार ब्रम्हपुरी उषा चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक अनिल जित्टावार, स्मिता पारधी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच सदर कार्यक्रमात विशेषतःहा प्रकाश सावकार पोरेड्डीवार अध्यक्ष गडचिरोली ग्रामीण बॅंक तथा अध्यक्ष हितकारनि शिक्षण संस्था आरमोरी आणि मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच घनश्याम जीवन कावळे नागपूर, प्रल्हाद धोटे वडसा, नामदेव कुथे चिंचोली यांचा चिंचोली दरबार तर्फे दरबारी सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात दर वर्षी प्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात कुनिका लालाजि पारधी ब्रम्हपुरी, यामिनि किशोर मेश्राम आरमोरी, आलाप तुषार सोम, रोशन देविदास दिवटे चिंचोली यांचा समावेश आहे. उर्स निमित्य चिंचोली बुजुर्ग या ठिकाणी रात्रौ ठीक १० वाजता अस्लम- मुकर्रम साबरी आणि राजा सर्फराज साबरी यांचा भव्य दुय्यम कव्वाली चा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त संखेत जनतेने उपस्थित रहावे, असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss