– तेली समाजातील समाजबांधवांनी तसेच महिला व युवा वर्गाने मोठया संख्येने उपस्थित राहावे.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्हाभरात आपल्या विखुरलेल्या तेली समाजाला एकसंघात, एकसूत्रात बांधण्यासाठी आणि समाजातील विविध विषयावर चर्चा २२ ऑक्टोबर २०२३ ला पार पडली होती, यामध्ये सर्वानुमते श्री संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव धुमधळाक्यात साजरा करायचे, असे ठरविण्यात आले होते.
याच अनुषंगाने रविवार २९ ऑक्टोबर २०२३ ला कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी नियोजनात्मक बैठकीचे आयोजन सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स (सामान्य रुग्णालय कॉम्प्लेक्स, गडचिरोली च्या समोर) या ठिकाणी सकाळी ठीक ११ वाजता आयोजित केली आहे.
तरी आपल्या समाजातील समाजबांधवांनी तसेच महिला व युवा वर्गाने मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी सहकार्य करावे, असे आव्हान श्री संताजी जगनाडे महाराज उत्सव समिती जिल्हा गडचिरोली यांनी केले आहे.