Latest Posts

कुऱ्हाडीने ३ वेळा वार करून पतीने पत्नीचे मुंडके केले धडावेगळे : बेतकाठी येथील घटना 

– ४ मुलींचे संसार आले उघड्यावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची (Korchi) : तालुका मुख्यालयापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे रात्री ३ वाजताच्या दरम्यान पत्नी आणि ५ वर्षाची मुलगी झोपेत असताना पती रोहिदास बंजार याने आपल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने ३ वेळा वार करून धडापासून मान वेगळी करून टाकली ही सर्व घटना ५ वर्षाची मुलगी बघत असताना तिला सुद्धा धमकावल्याची माहिती प्राप्त झाली असून आरोपी रोहिदास राऊत याला पोलिसांनी अटक केलेली आहे.

मृतक अमरोतीन बंझार (३३) आणि रोहिदास बंजार (३८) यांचे २००९ ला लग्न झाले व त्यांना ४ मुली असून नवव्या वर्गात असलेली सर्वात मोठी मुलगी ही घटनेवेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती व दोन मझव्या मुली हे आपल्या आजी कडे झोपून होते तर लहान मुलगी आरोपी रोहिदास व आपल्या आई सोबत झोपून होती. यापूर्वी सुद्धा रोहिदास आपल्या पत्नीला मारझोड करतो म्हणून ४ वर्षापूर्वी बेतकाठी येथे गावात बैठक घेऊन त्याची समझूत सुद्धा काढण्यात आली होती. परंतु कुठला तरी राग मनात धरून त्या नराधमाने आज आपल्या पत्नीला लहानशा चिमुकलीच्या समोर अक्षरशः संपवून टाकल्यामुळे या ४ लहान मुलींचे संसार आता उघड्यावर आले असल्याचे दिसून येत आहे.

सदर घटनेनंतर आरोपी यांनी आपली कुऱ्हाड लपविली होती. ती कुऱ्हाड कुठे लपविली ती त्या लहान चिमुकलीने पोलिसांना सांगितले व पोलिसांनी आरोपी रोहिदास यास अटक केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन कोरची चे प्रभारी अधिकारी वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

काही महिन्यापूर्वी आरोपी हा बोअर चे काम करण्याकरिता दुसऱ्या जिल्ह्यात गेला होता तिथ त्याने आपल्याच मालकाला सुद्धा मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Latest Posts

Don't Miss