Latest Posts

वाहन पलटून ३ महिलांचा मृत्यू तर १५ महिला जखमी

– डॉ. सतिश वारजुकर धावले अपघात ग्रस्ताच्या मद्दतीला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : ८ फेब्रुवारीला चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी तालुक्यातील माहेर खरबी येथील महिला मजूर चना कापण्याकरीता उमरेड विधानसभा क्षेत्रातील पिपरा येथे गेले असता काम आटोपून सायंकाळी परत येत असताना ६.३० ते ७ वाजता च्या दरम्यान सिर्सी जवळील सालेभट्टी मोडीवर वाहन चालकाने वाहना वरून नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी झाले. यामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर १५ महिला व वाहन चालक गंभीर जखमी झाले.

जखमींना प्रथम उपचारा करीता सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या घटनेची माहिती डॉ. सतीश वारजुकर यांना मिळताच लगेच सिर्सी येथे धाव घेतली. १५ महिला व वाहन चालक जांबुळघाट निवासी शंकर प्रभाकर मेश्राम (३०) या सर्वांना डॉ. सतीश वारजुकर यांनी चार ॲम्ब्युलन्स ने नागपूर मेडिकल ला स्वतः घेऊन गेले व ३ मृतक महिलांना करीता ऐका ॲम्ब्युलन्स ने उमरेड ला रवाना केले.

मृतक महिला मध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागडे यांचा समावेश आहे तर तन्वी विनोद मेश्राम, दुर्गा विजय अडकिने, संगीता देविदास अडकिने, विना विक्रांत अडकिने, सोना सिद्दुके, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागपुरे, मनोरथा शांताराम मेश्राम, सवित्रा बिसन अडकिने, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जना अर्जुन बागडे, अश्विनी अरविंद बागडे, शालू गौतम हे सर्व महिला गंभीर जखमी आहेत.

Latest Posts

Don't Miss