Latest Posts

३५० रुपयांसाठी हत्या : ६० वेळा चाकूने भोसकले, मृतदेहाजवळ केला डान्स

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नवी दिल्ली (Navi Delhi) : राजधानी दिल्ली एका भयानक हत्याकांडाने हादरली आहे. येथे बिर्याणीसाठी ३५० रुपये दिले नाही म्हणून १६ वर्षीय मुलाने १८ वर्षीय मुलाला ६० वेळा चाकूने भोसकले. एवढेच नाही तर आरोपीने मयताचे डोके धडावेगळे करण्याचाही प्रयत्न केला.

तसेच मृत्युनंतरही त्याच्या मृतदेहावर लाथा-बुक्क्यांनी प्रहार केला आणि क्रुरतेचा कळस गाठत मृतदेहाजवळ चाकू नाचवत डान्सही केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलकम पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या जनता मजदूर कॉलनीमध्ये मंगळवारी २१ नोव्हेंबर रात्री ही घटना घडली. प्राथमिक तपासामध्ये या हत्येमागील कारण चोरी असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी आई-वडिलांसोबत रहात होता. त्याचे आई-वडील मजुरी करतात. काही कारणास्तव आरोपीला शाळेतूनही काढून टाकण्यात आले होते. खून झाला तेव्हा आरोपी नशेमध्ये होता. तर मयत तरुण आईसोबत जाफराबाद येथे रहात होता. पीडित तरुण आणि आरोपी यांची एकमेकांशी ओळख नव्हती. आरोपी अचानक तरुणासमोर आला आणि त्याच्याकडे बिर्याणीसाठी ३५० रुपये मागू लागला. तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्या खिशातून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोघांमध्ये झटापटही झाला, यानंतर आरोपीने तरुणाला गळा दाबून बेशुद्ध केले.

तरुण बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने रात्री १० वाजून २० मिनिटांनी त्याला ओढत एका गल्लीमध्ये नेले आणि चाकूने वार करण्यास सुरुवात केली. आरोपीने तरुणाच्या गळ्यावर, कानाजवळ आणि चेहऱ्यावर जवळपास ६० वार केले. यातच तरुणाचा मृत्यू झाला.

तरुणाच्या मृत्यूनंतरही आरोपी मृतदेहाला लाथा-बुक्क्यांनी मारतो. एवढेच नाही तर चाकू उंचावून नाचतोही. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार घडला तेव्हा आजूबाजूच्या घरातून काही लोक बघतही होती. मात्र आरोपीने चाकूने धाक दाखवत त्यांना बाहेर येऊ दिले नाही. हत्येनंतर आरोपी फरार झाला. त्यानंतर पीडित तरुणाला पोलीस जीटीबी रुग्णालयात दाखल करतात, मात्र डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

Latest Posts

Don't Miss