Latest Posts

महिलाच करताहेत महिलांचा सौदा, गेल्या सात महिन्यांत सेक्स रॅकेटमधून ६८ महिलांची सुटका : पोलिसांची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : कोणी झटपट पैसा कमावण्याच्या उद्देशाने तर कोणी उतारवयात खर्च भागविण्यासाठी पैसे कमी पडत आहेत म्हणून अशा विविध कारणांनी शहराच्या विविध भागांत सेक्स रॅकेट्स (Sex rackets) चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.

गेल्या सात महिन्यांत मुंबई पोलिसांनी अशा घृणास्पद प्रकारात अडकलेल्या ६८ तरुणींची सुटका केली आहे. त्यात तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे काही प्रकरणांत महिलाच महिलांचा सौदा करत असल्याचे आढळले. गृहिणी असलेल्या महिलाही घरातूनच अशा प्रकारचे रॅकेट्स चालवत असल्याचे धक्कादायक वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे.

गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अंधेरीतील रविराज ओबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या माय-लेकी मैत्रिणींसह घरातूनच सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्षाने तिघांना अटक केली. त्यात ॲस्ट्रॉलॉजर सुनीता झा (६५), ट्विंकल झा (३१) आणि मधू उर्फ मॅडी रिकार्डो स्मीत (६४) या तीन महिलांचा समावेश आहे. व्यवसायाने ॲस्ट्रॉलॉजर असलेली सुनीता झा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मॉडेल मुली वा महिला पुरवून अंधेरी परिसरात सेक्स रॅकेट चालवत होती. त्यापाठोपाठ देवनारमध्येही केलेल्या कारवाईत महिलेला अटक केली. नोकरीसह वेगवेगळ्या बहाण्याने राज्यातील विविध भागातून तरुणींना मुंबईत आणत वेश्या व्यवसायात ढकलले जात होते.

६८ महिलांची सुटका केली :
अंमलबजावणी कक्षाच्या पोलिस निरीक्षक अनिता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेक्स रॅकेट्सवर कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या सात महिन्यांत मुंबईत १६ गुन्हे नोंदवत ६८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच सात महिन्यांत १०३ महिलांची सुटका करण्यात आली होती.
रेड लाइट विभागांसह रहिवासी इमारतींत वेश्याव्यवसाय सुरू आहेत, हे धक्कादायक आहे. अशा ठिकाणांवर गुन्हे शाखा लक्ष ठेवून असून, त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. मसाज पार्लरच्या नावानेही वेश्याव्यवसाय वाढत असल्याचे कारवाईतून स्पष्ट होत आहे. मसाज पार्लरही गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.

आजी-आजोबाही मागे नाहीत :
– मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याने पैशांसाठी चक्क घरातच वेश्याव्यवसाय सुरू केल्याचे समोर आले होते.
– मुलुंड पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला बेड्या ठोकल्या. आजोबा हे एका बड्या कंपनीतून निवृत्त झालेले आहेत तर त्यांची पत्नी गृहिणी.
– उतारवयात पैशांची कमतरता भासत असल्यामुळे घरखर्चाला पैसै मिळणेही कठीण झाले होते. म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.

पती कामावर गेल्यावर ती चालवायची सेक्स रॅकेट :
– चारकोप पश्चिमेच्या सेक्टर २ मधील एका टू बीएचके फ्लॅटमध्ये एक महिला रॅकेट चालवायची. पतीचे पार्टनरशिपमध्ये एक दुकान आहे, तर मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. यापूर्वी ही महिला विमा कंपनीत नोकरीला होती. त्यामुळे तिच्या संपर्कात अनेकजण होते. त्यामुळे कोण कसे काम करते, याचीही तिला माहिती होती. नोकरी सोडल्यानंतर ती घरीच असे. पती आणि मुलगी घराबाहेर पडल्यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान ती एकटीच घरात असे. याच दरम्यान तिने घरातूनच वेश्याव्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी व्हॉट्सॲपवरून तिने पूर्वी संपर्कात असलेल्या मुलींना याबाबत सांगून सेक्स रॅकेट चालवत होती. तिला अटक करण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss