– अकृषक व कृषिग्राहक अशा एकूण ७ लाख ६२ हजार ३८८ विविध वर्गवारीतील ग्राहकांची मोबाईल क्रमांकांची नोंदनी.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : ग्राहकसेवेस समर्पित एक पाउल म्हणून महावितरणच्या ग्राहकांना मीटररिडींग, वीजबील, ऑनलाईन बील, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएमएसद्वारे पाठविण्यात येतात. व या सर्व सेवा ग्राहकांना देण्यासाठी मोबाईल क्रमांकांची क्रमांकाची नोंदनी करने आवश्यक आहे.
चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील एकंदरीत ८ लाख ४५ हजार ४३१ अकृष्क व कृषिग्राहक ग्राहकांपैकी एकूण ७ लाख ६२ हजार ३८८ विविध वर्गवारीतील ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नोंदनी केली आहे. यात चंद्रपूर मंडलाती ४ लाख ३८ हजार ९७९ ग्राहक तर गडचिरोली मंडलातील ३ लाख २३ हजार ४०९ ग्राहकांचा समावेश आहे. परंतु ८३ हजार ४३ ग्राहकांनी मोबाईल क्रमाकांची नोंदनी केली नाही आहे. महावितरणला सर्वात माठी भेडसावणारी समस्या म्हणजे थकबाकी व थकबाकीसाठी वीजपुरवठा ख्ंडीत करण्याच्या नोटीसाही मा. वीजनियामक आयोग यांच्या आदेशानुसार एसएमएमस किंवा डिजीटल पध्दतीने निर्गमित करण्यात व ग्राहय धरण्यात येत आहेत.
चंद्रपूर मंडळातील अकृष्क ४ लाख २७ हजार ९७९ ग्राहकांपैकी ४ लाख १ हजार २६२ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नेांदणी केली आहे तसेच चंद्रपूर मंडळातील ४५ हजार ९९४ कृषिग्राहकांपैकी ३५ हजार ७१७ कृषि ग्राहकांनी ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नेांदणी केली आहे. अजूनही ३४ हजार ९९४ अकृषक व कृषिग्राहक ग्राहकांनी मोबाईल क्रमाकांची नोंदनी केली नाही आहे.
गडचिरोली मंडळातील अकृष्क ३ लाख ३१ हजार ४३७ ग्राहकांपैकी २ लाख ८९ हजार ३० ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. तसेच गडचिरोली मंडळातील ४० हजार २१ कृषिग्राहकांपैकी ३४ हजार ३७९ कृषि ग्राहकांनी ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नेांदणी केली आहे. अजूनही ४८ हजार ४९ अकृषक व कृषिग्राहक ग्राहकांनी मोबाईल क्रमाकांची नोंदनी केली नाही आहे.
महावितरणच्या ग्राहकांना मीटररिडींग, वीजबील, ऑनलाईन बील, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहेत. व या सर्व सेवा ग्राहकांना देण्यासाठी मोबाईल क्रमांकांची क्रमांकाची नोंदनी करने आवश्यक आहे. आहे. उर्वरीत ८३ हजार ४३ ग्राहकांनी मोबाईल क्रमाकांची नोंदनी केली नाही अशा ग्राहकांनी नोंदनी केल्यास त्यांनाही या सुविधा एसएमएसद्वारा प्राप्त होणार आहेत.
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स ॲप एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने वीजदर वाढ प्रस्ताव क्रमांक १९५/२०१७ च्या निकालानुसार मान्यता दिली असून डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्यात आली आहे त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्स ॲप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठविण्यात येत आहेत.
ग्राहकांना महावितरणच्या टोल फ्रि क्रमांकावर १८००२३३३४३५, १८००२१२३४३५ किंवा १९१२, ०१९१२ वर फोन करून नोंदनी करावी लागेल. किंवा ९९३३०३९९३३०३ या क्रमांकावर MERG ग्राहक क्रमांक उदा. MERG ४५००१०५२१३३२ अशाप्रकारचा एसएमएस पाठवून नोंदणी करता येईल. सदर एसएमएस पाठविल्यावर VK-MSEDCL द्वारा आपले रजिस्ट्रेशन झाल्याबाबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल. हा एसएमएस काही वेळा उशिरा प्राप्त होवू शकतो. परंतु आपले रजिस्ट्रेशन हे झालेले असेल. हे एसएमएस पाठवितांना स्पेस देण्यास विसरू नये.
चंद्रपूर परिमंडलातील ज्या ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल अशा सर्व ग्राहकांनी त्याची नोंदनी करण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.