– तसेच शैक्षणिक वर्ष २०२४- २५ करिता नुतन कार्यकारणी घोषित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अ.भा.वि.प. ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या ७६ वर्षांपासून अविरत पणे काम करीत आहे. तसेच कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम सुद्धा विद्यार्थी परिषद घेत असते. याच अंतर्गत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहेरी शाखाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर अहेरी नगराची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता नुतन कार्यकारणीची घोषित करणात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संतोष दुर्वा जनजाती कल्याण आश्रम प्रांत युवा आयाम प्रमुख, नगर अध्यक्ष गिरीष मदेरलावार, जिल्हा संयोजक रोहित श्रीरामवार, प्रांत कार्यकारणी सदस्य रितिका दांडिकवार आणि रोहित मुक्कावार यांची उपस्थितीत होते.
संतोष दुर्वा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि नवीन नगराध्यक्ष, नगर मंत्री आणि नगर कार्यकारिणी ची घोषणा केली. नगर अध्यक्ष प्रा. गिरीश मदेरलावार, नगर मंत्री रीतिका दांडिकवार आणि नगर कार्यकारिणी ची घोषणा करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले. अ.भा.वि.प. च्या कार्यकर्त्यांनी घडवून आणलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व पालकांनी स्वागत केले.
यावेळी अहेरी नवनिर्वाचित नगर कार्यकारिणीत नगर अध्यक्ष प्रा. गिरीश मदेरलावार, नगर उपाध्यक्ष प्रा. आदेश मंचारलावार, नगर मंत्री कू. रितिका दंडीकवार, नगर सहमंत्री करण मारशेट्टीवार, SFD प्रमुख जया चौधरी, SFD सह प्रमुख प्रणाली कन्नाके, SFS प्रमुख आयुष मामिडवार, SFS सह प्रमुख श्रुती आत्राम, कलामंच प्रमुख प्रतिक्षा कडते, खेलकार्य प्रमुख सुनील कुळमेते, छात्राकार्य पूर्वा सिडाम, जनजाती विद्यार्थी कार्य संजय तिम्मा, विशेष सदस्य राहुल श्यामकूवर, प्रा. धर्मेंद्र मुनाघाटे, वैदेही मुडपल्लीवार, रोहित श्रीरामवार, रोहित मुक्कावार सर्व दायित्वान कार्यकर्त्याचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.