विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गोंडवाणा गोंड समाज मुरुमगाव, मुरुमगाव जमीदारी ईलाका व जयसेवा कर्मचारी संघटना गोंडवाणा यांनी संयुक्तरित्या मुरुमगाव जमीनदारी ईलाकायातील एकुण ४० गावातील नागरीकाकरिता एक दिवस समाजासाठी हा अभिनव उपक्रम राबवुन त्या अंतर्गत समाज प्रबोधन, विद्यार्थी करीता शैक्षणीक मार्गदर्शन व समस्त जनते करीता आरोग्य शिबीर चे आयोजन १६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रस्तावित गोंड समाजभवन, कटेझरी रोड मुरुमगाव येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमात मुरुमगाव व टिपागड क्षेत्रातील सर्व गावातील नागरीक तसेच रांगी, मोहली, येरकड, सुरसुंडी, मुरमाडी व मालेवाडा क्षेत्रातील नागरिकांनी स्वंयस्फ़ुर्ती ने सहभाग घेऊन शिबीर कार्यक्रम मधील सेवेचा लाभ घेतला.
कार्यक्रम चे उद्घाटक भुपेद्रंशहा मडावी महाराज (माजी जमीदार,मुरुमगाव क्षेत्र), कार्यक्रम चे अध्यक्ष अमरशाह मडावी महाराज (अध्यक्ष, गोंडवाणा समाज टिपागड क्षेत्र) यांच्या हस्ते पार पडले. समाज प्रबोधन करीता प्रमुख वक्ते प्रा. नरेश मडावी ईतिहास विभाग प्रमुख, डॉ. प्रमोद खंडाते जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली, डॉ कन्ना मडावी, डॉ सचिन मडावी (समाज कल्याण आयुक्त), डॉ. बागराज जी धुर्व, डॉ. आशिष जी कोरेटी व प्रमुख अतिथी नारायण जी वट्टी, रविंद्र होळी तहसीलदार, राजेश जी नैताम, अजमन जी रावटे, गवर्ना जी सरपंच ग्रा.प. मुरुमगाव, कुमार आदित्य व्यवस्थापक, पंजाब नशनल बक, गितेश कुळमेथे चंद्रपुर हे हजर होते. प्रस्ताविक सुरेश नैताम यांनी जयसेवा कर्मचारी संघटना मुरुमगाव व गोंड समाज यांच्या मार्फ़त आयोजीत एक दिवस समाजासाठी या कार्यक्रमाचे उद्देश्य विषद करुन समाजातील व दुर्गम भागातील समाजबांधव यांनी शिक्षणाचे महत्व ओळखुन आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणेबाबत आग्रही व जागरुक रहावे, समाजातील शिक्षित व कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद ठेवुन आपले शासकीय कार्यालयीन कामे वा ईतर कामे करतांना मनात कोणतीही न्यनगंड न ठेवता व आपल्या समाजाचा अभिमान बाळगावा हे नमुद केले. डॉ. आशिष कोरेटी यांनी गोंडी भाषेतुन समस्त जनतेशी संवाद साधुन आरोग्य शिबीर करीता आलेले मेडीट्रिना हॉस्पीटल, नागपुर, किंग्सवे हॉस्पीटल, एलेक्सीस हॉस्पीटल, आंरेज सिटी हॉस्पीटल यांनी आपली आरोग्य सेवा पुरविल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. समाजातील नविन पिढी ने शिक्षणाचे महत्व ओळखुन आपले शिक्षण घ्यावे, असे भावना व्यक्त केले.
प्रमुख वक्ता डॉ. नरेश मडावी यांनी प्राचीन काळापासुन ईतिहासाचा अभ्यास केल्यास गोंड समाज हा संस्कृतीने, कलेने व पंरपरेने समृध्द असा समाज आहे,गोंड समाजाचा ईतिहास मध्ये गोंड कालीन साम्राज्य हाच खरा रामराज्य होता, असे प्रतिपादन केले. आपण गोंड समाजाचे आहोत ही अभिमानाची बाब आहे, यांचा वारसा चालवितांना आपला उत्तम शिक्षण व त्यासोबत उत्तम संभाषण कला असणे ही काळाची गरज आहे,जेणेकरुन ईतर समाजाला आपले महत्व पटवुन देता येईल. रविंद्र होळी यांनी समाजाचा विकास साधतांना आपले वैभवशाली पंरपंरा, देवीदेवता, ठाकुर देव यांचा अभ्यास करुन त्या लेखणीबध्द करणे ही काळाची गरज असल्याचे नमुद केले. डॉ. खंडाते सर यांनी शिक्षण हेच आपल्या यशाचे व्दार आहेत, शिक्षणाने आपण समृध्द व विकसीत तर होऊच पण वरिष्ठ पदावर विराजमान होऊन आपला समाज बांधवाची सेवा अधिक उत्तमपणे करु शकु, सल्ला उपस्थीत नागरिकांना दिला. प्रमुख अतिथी वट्टी साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, त्यांचा काळात (सन १९८० ते १९९०) शिक्षण घेतांना येत असलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात व अभ्यासाची जिद्द व चिकाटी याबाबत विद्यार्थीना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक अमरशहा मडावी अध्यक्ष, गोंड समाज टिपागड क्षेत्र यांनी आपला क्षेत्र हा फ़क्त कृषी क्षेत्र असुन पांरपांरीक शेती व काळानुरुप होत असलेला बदल लक्षात घेता शासकीय योजना व आधुनिक शेतीच्या आधारे आपले उत्पन्न वाढविणे, आपला मुलांचा शिक्षणाकडे जातीने लक्ष देऊन त्याचा सर्वागींन विकासाकरीता प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आरोग्य शिबिरात नेत्ररोग तज्ञ, हद्यरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ सह वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ रोग यांनी आपली सेवा दिली. कन्ना मडावी साहेबांनी आपले वैदयकीय सेवा दिली व समाजातील लोकांत मिसळुन त्यांचाशी संवाद साधुन त्याचा समस्या जाणुन घेतल्या. उक्त कार्यक्रमात सचिन मडावी समाज कल्याण आयुक्त गडचिरोली, डॉ. प्रियंका मडावी स्त्रीरोग तज्ञ यांनी आपली सेवा उपलब्ध करुन दिली तसेच १०० ब्लकेंट समाज बांधवाना वाटप करण्याकरीता उपलब्ध करुन दिली.
कार्यक्रमात एकुण १ हजार ७४८ रुग्णांनी नोंदणी करुन आरोग्य सेवेचा लाभ घेतला, पैकी ५९८ लोकांना मोफ़त चश्मे वाटप करण्यात आला तर ६८ लोकांना पुढील उपचाराकरीता नोंद करण्यात आली आहे. उक्त सर्व रुग्णची वैद्यकीय तपासणी करुन मेडीट्रीना हॉस्पीटल, नागपुर येथे मोफ़त उपचार करण्यात येणार आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र शासन यानी आपले विश्वासु पत्रकार गजपुरे मार्फ़त समाजबांधवासाठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमाबाबत गोंडवाणा गोंड समाज मुरुमगाव व जयसेवा कर्मचारी संघटनेचे अभिनंदन बाबत संदेश समस्त जनतेला दिले आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागेश टेकाम यांनी केले व या कार्यक्रमाबाबत अथक परिश्रम घेनारे डॉ. आशिष कोरेटी, मेडीट्रीना चे चमु, गोंडसमाज मुरुमगाव, रिडवाही,कुलभट्टी, खेडेगाव, बेलगाव, पन्नेमारा, कन्गडी, उमरपाल,कोसमी, देवसुर,गरापत्ती, सावरगाव येथील नागरीक, शासकीय रुग्णालय, गडचिरोली, प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव, ग्राम पंचायत मुरुमगाव, जंगल कामगार सहकारी सोसायटी, मुरुमगाव, जंगल कामगार सहकारी सोसायटी, बेलगाव व समस्त जनतेचे आभार व्यक्त केले.