– कमलापूर येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : खेळ कोणताही असो, त्यात जय-पराजय हा आपलाच मात्र पराजयाने खचून न जाता जिंकण्याची जिद्द जिवंत ठेवली पाहिजे. सतत जिंकणाऱ्या संघाने खेळाडूने विजयाचा अहंकार न बाळगता आपल्यालाही कधीतरी पराजयाचा सामना करावा लागू शकतो याचे भान असू द्यावे, जीवनात खेळाचे महत्व हे अनन्य साधारण आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. ते पी.एम.क्लब द्वारे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान समिती द्वारे आयोजित शिवजयंती कार्यक्रमस्थळी जाऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मंडळाच्या तरुणांशी संवाद साधला.
याप्रसंगी मंचावर युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, संतोष मद्दीवार, भाजपा तालुका अध्यक्ष, संदिप रेपलवार, संदिप ओलेटीवार, श्रीधर दुग्गीराला, अरविंद परकीवार, रवि पंजलवार, बाबुराव चापले, श्रीनिवास मंचकवार, भगवंत येमुलवार, जीवन पोतेरी, सचिन ओलेटीवार, सुदीप रंगुवार, जीवन पोरेटी, श्रीनिवास मंचलवार, छाया आईलवार यांच्यासह असंख्य गावकरी उपस्थित होते.