Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा आश्वासनाने सिरोंचा येथील शेतकऱ्यांनी ७ दिवसांनी उपोषण सोडले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : सिरोंचा तहसील कार्यालय समोर गेल्या ७ दिवसांपासून शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण चालू होते, याची माहिती मिळताच काल सिरोंचा जाऊन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आंदोलनकर्त्यांशी बराच वेळ सकारात्मक चर्चा केली.

यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन राजेंना दिले. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच शेतकऱ्यांचे सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन राजेंनी यावेळी दिल्याने आंदोलकांचे समाधान झाले.

त्यांनतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हस्ते उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना निंबु पाणी पाजून हे आंदोलन संपविले. यावेळी सिरोंचा तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss